Header Ads Widget

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्या प्रकरणातील नांदेडच्या सहा आरोपीला शोधन्यात यश आले असले तरी मुख्य हत्यारी बेपत्ताच ? पोलीस अधिकाऱ्याची पत्रकार परिषद --

पोलीसाच्या तपासाची स्पीड वाढली


नायगाव फास्ट न्यूज :- माधव पवार :-

नायगाव तालुक्यातील मौजे कोलंबी येथील रहिवासी असलेले तथा सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची दिवसा ढवळ्या हत्या हल्लेखोरांनी गोळया झाडून दिनांक पाच एप्रिल २०२२ रोजी बियाणी यांची दोन मारेकऱ्यानी गोळ्या झाडून हत्या केली होती तब्बल दोन महिन्याच्या कालावधी नंतर पोलिसांनी तपासाची स्पीड वाढविल्यामुळे या हत्या कांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले असले तरी सदर घटनेतील मुख्य आरोपी अध्याप फरार असल्याचे सांगण्यात येत असले तरी पोलीसाला त्या मुख्य हल्ले खोराचा शोध घेण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे 
नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी,नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, यांच्यासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक तथा एस आय टी चे प्रमुख विजय कबाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  द्वारकादास चिखले, यांच्यासह आदी पोलीस अधिकारी यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित होते 
तालुक्यातील मौजे कोलंबी येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्याकडे खंडणी आणि दहशत पसरवण्यासाठी आरोपीनी ही हत्या केल्याचे सांगण्यात येत असून बियाणी यांच्या हत्येमागे कुख्यात गुंड रिंधाचा संबध असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून संजय बियाणी यांच्या हत्या प्रकरणातील सहा आरोपीला करण्यात आल्याच्या नंतर नांदेड परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्या पत्रकार परिषदेत बियाणी यांच्या हत्या प्रकरणातील सहा आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांना मिळाले असल्याची माहिती दिली आहे
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्या
 प्रकरणात पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीचे नावे (१) इंद्रपालसिंघ उर्फ सनी,पिता, तिरथसिंघ मेजर वय वर्ष ३५, (२) मुक्तेश्वर उर्फ गोलू विजय मंगनाळे वय वर्ष २५, ( ३ ) सतनामसिंघ उर्फ सता, पिता, दलबीरसिंघ शेरगिल वय वर्ष २८, ( ४ ) हरदीपसिंघ उर्फ सोनू पिनीपाना,पिता,सतनामसिंघ बाजवा, वय ३५ वर्ष, ( ५ ) गुरमुखसिंघ उर्फ गिरी, सेवकसिंघ गिल वय २४ वर्ष ( ६ ) करणजितसिंघ पिता, रघवीरसिंघ शाहू वय ३० वर्ष सर्व राहणार नांदेड हे सदरच्या हत्या प्रकरणातील सह आरोपी असल्याचे सांगण्यात आले आहे