ग्रामीण भागात ऑनलाईनचा
खेळखंडोबा ••
माधव पवार
प्रधानमंत्री किसान योजना ही शेतकऱ्याच्या हितासाठी असली तरी बारा महिन्यात फक्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पडत असल्यामुळे शेतकरी तितक्यातच समाधान व्यक्त करीत होता परंतु शासनानी शेतकऱ्यांना केवायसी करून घेण्यासाठी सांगितले असले तरी सदरची साईड अनेक वेळा बंद पडल्यामुळे केवायसी करण्या पासून अध्याप वंचित असल्यामुळे शेतकऱ्यातुन संताप व्यक्त केला असून शासनानी ३१ मे २०२२ शेटची तारीख केवायसी करण्यासाठी ठेवली परंतु सदरची साईड गेल्या तीन ते चार दिवसापासून बंद असल्यामुळे ऑनलाईनचा खेळखंडोबा ग्रामीण भागात झाला आहे
१२ कोटींहून अधिक शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या हप्त्याच्या प्रतीक्षेतअसले तरी केवायसीची साईड बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान योजना लाभ मिळण्यासाठी शेतकरी राजा कडाक्याच्या उन्हात केवायसी करण्यासाठी सर्वत्र फिरत असूनशासनाच्या तूटपुंज्या मदतीसाठी शेतकऱ्यांना हैराण व्हावे लागत असताना दिसून येत असून पंतप्रधान किसान योजना म्हणजे शेतकऱ्याचें डोळे फुसण्या सारखी असून बारा महिन्याला सहा हजार रुपये बँके खात्यात पडत असले तरी दर महा फक्त ५०० रुपयेच देत असून त्यात केवायसी करण्यासाठी नियमावली दुसरीकडे अनेक वेळा साईड बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे
------------------------------------------------------------------
ग्रामीण भागातील केवायसी करत असताना बऱ्याच पैकी शेतकऱ्याच्या हाताच्या बोटाचे ठसे येत नाहीत त्यांचें ही पैसे बंद होणार का आणि पर्याय काय ? --
-------------------------------------------------------------------
एप्रिल ते जुलै दरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचें सांगण्यात आले गेल्या काही दिवसांत केंद्रीय कृषिमंत्र्यांनी एका कार्यक्रमा दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यासाठी आकरावा हप्ता जाहीर करण्यासाठी सांगितले मात्र दुसरीकडे अशी हीबातमी आली की शेतकऱ्यांनी दिनांक ३१ मे तारखे पूर्वी ई-केवायसी करणार नाहीत त्यांच्या खात्यात पैसे मिळणार नाहीत असे सांगितले परंतु केवायसी साईडच बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना केवायसी करणे शक्य झाले नाही याला जबाबदार कोण असा प्रश्न शेतकऱ्यासह जनतेला पडला असून शासनाने केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना तारखेची मर्यादा ठेवू नये असे शेतकऱ्यातुन मागणी होत असली तरी ऑनलाईनचा खेळखंडोबा झाला आहे
