Header Ads Widget

नांदेडात धक्कादायक घटना राज्याच्या माजी मंत्र्याच्या घरात घुसला दिवसाढवळ्या बंदुक धारी नोकराला माराहाण •••

माजी मंत्री डी पी सावंतवर ही

रोखली बंदूक नांदेडच्या सुरक्षितेचे

भविष्यात काय होणार ? 




नांदेड /नायगाव --सुनील रामदासी / माधव पवार 

राज्याचे माजी मंत्री डी पी सावंत यांच्या घरात शिरत एका बंदुकधारी तरुणाने त्यांच्यावर बंदूक रोखली तर त्यांच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना नांदेड शहरात घडली असल्याची धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली असून माजी मंत्री सावंत यांच्या नांदेडात असलेल्या निवासस्थानी ही सदरची घटना घडली असून सावंत यांचे निवासस्थान हे  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचें पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या घराच्या समोरच्या बाजूस असून साहील माने नावाचा हा तरुण सकाळी ९ ते सव्वा  नऊच्या दरम्यान डीपी सावंत यांच्या शिवाजी नगर येथील निवासस्थानी आला होता त्याने सावंत यांची भेट घेतली आणि काही कामा निमित्त  भेटण्यासाठी आला असल्याचें सांगण्यात आले आहे
राज्याचें माजी मंत्री डीपी सावंत यांच्या दुपारी परत इकदा तरुण यांच्या निवासस्थानी आला काही कामासाठी त्याने सावंत यांच्याकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केल्याचे ही सांगण्यात येते सावंतनी पैसे नसल्याचे त्या तरुणांला सांगितल्याचे समजते -भविष्यात नांदेडच्या सुरक्षिते काय होणार ? 
नांदेड येथील निवास स्थानातून येथील कार्यरत असलेले कर्मचारी सुभाष सावंत याने त्या युवकांना घरा बाहेर काढले असल्यामुळे तब्बल एक तास घराच्या बाहेर असलेल्या बाकावर तो युवक बसून होता असे सांगण्यात येत असून दुपारी साडे तीनच्या सुमारास आरोपी साहील माने पुन्हा घरात शिरला आणि माजी मंत्री डी पी सावंत यांच्या कडे त्याने पुन्हा पैशांची मागणी करीत असताना डी पी सावंत यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला बोलावून घेतले त्या तरुणांस बाहेर काढण्यास सांगितले असून कर्मचारी सुभाष सावंत यांनी सदरचा आरोपी तरुण साहील माने याला धरून बाहेर नेत असताना एका क्षणाचा विलंब न करता अचानक त्याने बंदूक काढलीआणि बंदुकीने पवार यांच्या डोक्यात ४ ते ५ वेळा मारहाण केली व माजी मंत्री डी पी सावंत यांच्यावर सुद्धा बंदूक रोखल्याची घटना नांदेड येथे घडली आहे