संजीव पाटील इज्जतगांवकर यांची
जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी -
सुनील रामदासी / माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील रहिवासी असलेले माजी मंत्री तथा खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे चिरंजीव कुंटूरकर शुगर कारखान्याचे मालक व चेअरमन राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या कारखान्याची सीबीआय ईडीची चौकशी करून कारवाई करण्यात यावी या मागणीचें निवेदन संजीव पाटील इज्जतगावकर यांनी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्याला देऊन कळविले असून सदरच्या कारखानदारानी गेल्या चार ते पाच वर्षा पासून मळीची अवैध रित्या विक्री करत असल्याचा व शेतकऱ्यांच्या ऊसाचा काटा मारून लूट करीत असल्याचे ही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
तालुक्यातील कुंटूरकर शुगर कारखाना हा पूर्वी जय आंबिका सहकारी साखर कारखाना या नावाने काढला व नंतर कुंटूरकर शुगर नावाने चालविणाऱ्या कारखाना मालक तथा चेरमन राजेश देशमुख कुंटूरकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा पुढचा पर्याय म्हणून देशाचे ग्रहमंत्री अमित शाह आणि राज्याचें मुख्यमंत्री, सहकार मंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नेऊ असे ही सांगितले असून नांदेड जिल्ह्यातील काही प्रमुख सहकारी साखर कारखान्यातील पुर्वीचा जय अंबीका सहकारी साखर कारखाना व याचेच रूपांतर कुंटुरकर शुगरर्स एँग्रो प्रा.लि.कुंटुर मनमानी कारभार चालू करून मळीचा वापर योग्य पद्धतीने करत नसल्याचा ही संजीव पाटील इज्जतगावकर यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे
कुंटुरकर शुगरर्स एँग्रो प्रा.लिमिटेड यांनी गाळप २०२१ ते २०२२ या वर्षात झालेल्या मळीचा वापर अवैद्य साठा जमिनीत खड्डा करून केलेला असल्यामुळे व सदर कारणांमुळे आजु बाजुच्या गावातील नागरिकांना व जनावरांच्या आरोग्यावर खुप मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातं असून कांही अंतरावरच गोदावरी नदीचे पात्र असून या गोदावरी नदीच्या आजु बाजूच्या गावाना पिण्यासाठी पाणी पुरवठा या नदीतुनच होत असतें या सर्व बाबींचा विचार करण्यात यावा व कुंटुरकर शुगरर्स एँग्रो प्रा.लि.चेअरमन यांच्यावर त्वरित कारेवाई व्हावी आशी मागणी जिल्हाधिकाऱ्याला दिलेल्या निवेदनात केली आहे.
