Header Ads Widget

राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांच्या स्वप्नातील महाराष्ट्राचे वृक्षाची मोठया प्रमाणात कत्तल होत असल्यामुळे होतोय वाळवंट वृक्षाची तोड थांबवा निसर्ग प्रेमीची मागणी -


      माधव पवार 
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदावर विराजमान असताना औरंगाबाद एका कार्यक्रमात म्हणाले होते राज्यासह ग्रामीण भागात वृक्षा ची मोठया प्रमाणात तोड होत असल्यामुळे येत्या काही वर्षातच महाराष्ट्राचे वाळवंट झाल्या शिवाय राहणार नाही त्यांच्या ह्या उदगार वाक्यामुळे सध्याच्या परिस्थितीत पाहिले तर वनविभाग अधिकाऱ्याच्या बेजबाबदार पणामुळे वृक्षाची मोठया प्रमाणात कतल होत असल्यामुळे सर्वत्र ग्रामीण भागात वाळवंटाचे स्वरूप झाल्याचे दिसून येत असून यामध्ये प्रमुख्याने आंब्याच्या झाडाची व लिंब, चिंचच्या वृक्षाची झाडे नस्ट होताना दिसून येत आहे
राज्यातील तत्कालीन माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र अक्षरशः वृक्ष तोडीमुळे वाळवंट होताना दिसून येताना सुद्धा महोदय वनमंत्री वृक्ष तोड करणाऱ्या मालकावर कार्यवाही करण्यासाठी कसल्याच प्रकारचे आदेश पारीत करीत नसल्यामुळे नायागांव तालुक्यासह ग्रामीण भागात वनपरीक्षेत्र अधिकारी देगलूर अधिकाऱ्याच्या संगनमताने वृक्षाची मोठया प्रमाणात कतल होताना दिसून येत असून यात आंबा, चिंच, लिंबू, रोहिणी, बाभूळ, अन्य वृक्षाची तोड होत असताना सुद्धा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याचे जाणूनबुजून डोळे झाक केले जात असल्यामुळे दिवसा ढवळ्या वृक्षाची कतल करून अधिकाऱ्याच्या देखत नांदेड ते हैद्राबाद राज्यमहामार्गांवरुन वाहतूक होताना दिसत आहे
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात म्हणजे मांजरम, कुंटूर बरबडा नरसी राहेर या भागातून खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांचे मौल्यवान झाडे आवण्याचे पावणे झाडे खरीदी करून वृक्षाची मोठी तोड होताना दिसत असून कोणताही व्यक्ती म्हणजे वन प्रेमी लोकांकडून वृक्ष तोड करणाऱ्या लोकाला विचार पूस केली असता त्यांच्या कडून असे उत्तर मिळत की अधिकाऱ्याच्या सहमती नुसारच सदरचा व्यवसाय करण्यात येत असून आम्ही वृक्षाची कतल करताना कोणी ही रोखू शकत नाही अधिकारी सक्षम असताना आम्हाला कशाची भीती नाही यामुळे सदरच्या वृक्षाची मोठया प्रमाणात वृक्षाची तोड राजरोषपणे होताना दिसून येत असून "
प्रशासनाच्या दारी आंधळं दळतय कुत्र पीठ खातोय 
 " अशी म्हण्याची वेळ आली असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेवर आली आहे