Header Ads Widget

जिल्हा परिषद सदस्य विद्यमान माणिकराव लोहगावे यांनी रुई येथे सैनिकांच्या कुटुंबाची भेट घेऊन केले सांत्वन !!!!


        माधव पवार 
 नायगाव तालुक्यातील मौजे रुई बुद्रुक येथील रहिवासी असलेले व भारत-पाकिस्तान युद्धात जखमी झालेले जवान भास्कर गंगाधर गोरटकर यांच्या वीर मातोश्रीचे नुकतेच निधन झाले असल्यामुळे नरसी जिल्हा परिषद गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांनी सैनिकांच्या कुटुंबाची दिनांक १६ मे २०२२ रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान भेट घेऊन सांत्वन केले यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य लोहगावे म्हणाले की मानव धर्मात जन्म मृत्यू आटळ असल्यामुळे सदरच्या वीर मातेचे निधन हृदय विकाराच्या झटक्याने झाल्यामुळे गोरटकर कुटुंबियाच्या दुखा सुखात लोहगावे परिवार असल्याचे ते म्हणाले आहे
तालुक्यातील रुई बुद्रुक येथील एका सैनिकाची वीर माता भारतीय सैनिक भास्कर गंगाधर गोरटकर यांना भारत भूमीचे रक्षण करण्यासाठी देशाला अर्पण केली त्या अनुषंगाने भारत भूमीचे रक्षण करण्यासाठी सैनिक भास्‍कर गोरटकर हा देशाची सेवा करण्यासाठी अनेक वर्षा पासून सेवेत कार्यरत असून यांच्या वीर मातोश्री दिवंगत मंजुळाबाई गंगाधर गोरटकर ह्या गोरटकर परिवाराला सोडून निघून गेल्या त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून नरसी जिल्हा परिषद गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांनी गोरटकर परिवाराची दुखत भेट घेऊन त्यांच्या कुटूंबाचे सांत्वन केले व त्यांना मोठा धीर दिलाआहे
 जगात अनेक माता जन्मास येतात आणि बाळाला जन्म ही देतात परंतु आपल्या बाळाला देश रक्षणासाठी देशाच्या सीमेवर पाठवणाऱ्या माता या वीर माता असतात असे उदगार जि प सदस्य माणिकराव लोहगावे यांनी काढीत भारतीय सैनिक भास्कर गंगाधर गोरटकर, सुभाष गंगाधर गोरटकर,आणि गंगाधर लक्ष्मणराव गोरटकर यांना मोठा धीर देऊन गोरटकर परिवारावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरात सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य विद्यमान माणिकराव लोहगावे यांनी सदरच्या परिवाराला भेट देऊन थोडक्यात तीव्र दुःख व्यक्त केले असून यावेळी माजी सरपंच भुजंगराव पाटील शिंदे, माजी सरपंच रावसाहेब पवार, पत्रकार माधव पवार, संतोष धोंडिबा जिगळे, यादी यावेळी उपस्थित होते

जिल्हा परिषद नरसी गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांच्या वतीने कृष्णा रामदास जिगळे यांच्या सत्कार !!


रुई बुद्रुक येथे अचानक लागलेल्या आगीत पीडित शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असल्यामुळे नरसी जिल्हा परिषद गटाचे विद्यमान भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांनी सदरच्या अग्नि तांडवात कडब्याची गंजी जळून खाक झालेल्या शेतकऱ्यांच्या झोपडीची व कडब्याची पाहणी करून जिल्हा परिषद नांदेड यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला जनावराच्या वैरण यासाठी  आर्थिक मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली यावेळी सदरच्या अग्नितांडवात झोपड्यात बांधून असलेल्या दोन बैलासह एका म्हेशीला अग्नितांडवातून कृष्णाचे रूप घेऊन रुई बु येथील १४ वर्षांचा बालक कृष्णा रामदास जीगळे यांनी मुख्या प्राण्यांचे जीव वाचून जीवदान दिल्यामुळे जिल्हा परिषद नरसी गटाचे जिल्हा परिषद नरसी गटाचे जि प सदस्य माणिकराव लोहगावे यांच्या हस्ते यावेळी त्या बालकांचा शाल टाकून सत्कार व अभिनंदन केले आहे