Header Ads Widget

नायगावच्या पत्रकाराच्या लेखनीच्या माध्यमातून विकास कामा बरोबरच लोकांच्या अडचणी ही मार्गी लागतात वसंतराव चव्हाण यांचे प्रतिपादन !!!


नायगांव / रामप्रसाद चन्‍नावार 

पत्रकारांच्या लेखनीच्या माध्यमातून विकास कामा बरोबरच सर्वसामान्य लोकांच्या समस्याला वाचा फुटते.नायगांव तालुक्यातील पत्रकार आपले कार्य निष्ठेने आणि वस्तू निष्ठ पणे करित आसल्याने तालुक्यातील अनेक विकास कामाला चालना मिळाली हे मान्यच करावे लागते असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आ.वसंतराव चव्हाण यांनी केले ते नायगांव तालुका मराठी पत्रकार संघास पत्रकार परिषदेचे विभागीय पुरस्कार मिळाल्याचे औचित्य साधुन त्यांनी आयोजीत केलेल्या पत्रकार सन्मान सोहळ्यात अध्यक्ष पदावरून बोलत होते
या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप नागपूरकर,माजी जि.प.सदस्य माधवराव बेळगे,जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर,हानमंतराव चव्हाण,उपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार,  प्रभारी लक्ष्मण भवरे,तालुका संघाचे अध्यक्ष श्रीनिवास चव्हाण,नायगांव एज्युकेशन सोसायटी चे सचिव प्रा रविंद्र चव्हाण, तालुका संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी,सरचिटणीस दिलीप वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती 
ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले  मराठी पत्रकार परिषदेचा सन्मानाचा स्व. वसंतराव काणे आदर्श पुरस्कार माझ्या नायगांव तालुका पत्रकार संघाला मिळालेला बहुमान आमच्या साठी अभिमानाची बाब आहे नायगांव तालुका संघाचे कार्य मोलाचे आहेच पण राजकीय जडणघडणी सह तालुका निर्मिती बरोबरच अनेक जनहिताच्या कार्यात  मोलाचे योगदान असल्याचे चव्हाण म्हणाले या वेळी उपस्थित तालुक्यातील पत्रकार व प्रमुख मान्यवर मंडळींचा सत्कार उपस्थित मान्यवरांनी केला.या वेळी बोलतांना नागपूरकर यांनी पत्रकारीनी आपल्या अडी अडचणी सोडवण्या साठी एक संघ राहून जनतेचे प्रश्न मांडत आपल्या मागण्यासाठी संघर्ष करण्या पुढे येण्याचे आवाहन केले.या प्रसंगी  सोनखेडकर यांचे ही भाषण झाले.या कार्यक्रमाचे संचलन दत्ता येवते यांनी तर आभार प्रा.रविंद्र चव्हाण यांनी मानले आहे
रविवार दि.१५ मे रोजी श्रीनिवास चव्हाण यांच्या फार्म हाऊवर  निसर्ग रम्य वातावरणात  सायंकाळी आयोजीत या कार्यक्रमास सुधाकर चव्हाण, नगराध्यक्षाचे   प्रतिनिधी नारायण जाधव,डाॅ. विश्वास चव्हाण,नगर सेवक पंकज चव्हाण,गजानन चव्हाण,संजय चव्हाण,रमेश शिंदे,पञकार गंगाधर भिलवंडे,मनोहर तेलंग, सय्यद जाफर, सुभाष पेरकेवार, रामप्रसाद चन्नावार, रामराव ढगे, गंगाधर गंगासागरे, पंडीत वाघमारे, गोंविंद नरसीकर, अनिल कांबळे, मनोहर मोरे, शिवाजी पन्नासे, लक्ष्मण बरगे, शेषराव कंधारे, मारोती बारदेवाड, प्रकाश महीपाळे, शेषराव बेलकर, साहेबराव धसाडे, श्याम गायकवाड, निळकंठ जाधव,सहदेव तूरडवाड,भगवान शेवाळे.किरण वाघमारे, मधुकर जवळे,हणमंत वाडेकर, शेख अजिम, आनंदा डाकोरे,विश्वाभंर वन्ने, माधव पवार ,विठ्ठल गोडगेवार, परमेश्वर जाधव,बाबासाहेब शिंदे. बालाजी शिंदे.

 हानमंते,बळीराम गायकवाड.सत्तार इनामदार.अंकुश देगावकर. बालाजी शिंदे,श्रीनिवास शिंदे,साईनाथ चन्नावार,कैलास ताटे.विश्वनाथ तमलुरे,अजय सुर्यवंशी. आदींची उपस्थिती होती.