Header Ads Widget

नायागांव तालुक्यातील सुजलेगाव येथील रहिवासी असलेल्या सुभाष भीमराव सज्जनला राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार प्राप्त !!!


       माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे सुजलेगाव येथील रहिवासी असलेल्या सुभाष भि. सज्जन यांना राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार नुकताच प्राप्त झाला असून येथील नव युवक तरून सुभाष भिमराव सज्जन यांना २०२१ सालाचा राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल क्रीडारत्न पुरस्कार प्राप्त झाला हा पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या तर्फे समाजातील विवीध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वाला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो त्या अनुषंगाने  सुभाष सज्जन यांना देण्यात आला आहे
तालुक्यातील मौजे सुजलेगाव येथील रहिवासी असलेले 
सुभाष भीमराव सज्जन या तरुणांनाला सदरचा पुरस्कार प्राप्त झाला असल्यामुळे त्यांचे नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून विविध क्षेत्रात राज्यस्तरीय, राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय व इतर अनेक पुरस्कार मिळाले त्यांनी प्राप्त केले आणि सामाजीक, शैक्षणिक, क्रीडा व युवा उद्योगजक अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार पुणे येथे ह.भ.प.श्री. श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर,मा.डॉ. जे.सानिपीना राव,मा डॉ शुभदा जोशी अशा विशेष मान्यवरांच्या उपस्थित सदरचा पुरस्कार देण्यात आला आहे
पुरस्काराचे स्वरूप : सन्मानचिन्ह, गौरवपदक, मानपत्र, महावस्त्र, मानकरी बॅच आणि मानाचा फेटा असे होते हा पुरस्कार मिळाल्या बद्दल विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक कार्यकर्ते मित्रमंडळी व समस्त सुजलेगाव येथील गावकरी मंडळी आणि समाजातील बांधव इतर मान्यवरांकडून सर्वत्र कौतु होताना दिसून येत आहे