Header Ads Widget

काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा नांदेड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष दिवंगत रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांच्या विशाल विचाराला टाकळी येथे अखेरचा निरोप --


         माधव पवार 
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा माजी मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या विचारधारे नुसार काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा नांदेड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांच्या विशाल विचार श्रेणीला त्यांच्या मुळ गावी म्हणजे नायगाव तालुक्यातील मौजे टाकळी येथे अखेरचा निरोप देण्यात आला आहे
काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक वेळा बरबडा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे जेष्ठ नेते दिवंगत रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर निवडून आले होते टाकळीकर हे चांगल्या विचारला उजाळा देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ पणे काम केले अचानक पणे काहाळा येथे तब्येत बिघडल्यामुळे तात्काळ नांदेड येथे उपचारासाठी नेण्यात आले होते परंतु ऱ्हदय विकाराचा झटका आल्यामुळे दिवंगत रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे
नांदेड जिल्हा परिषदचे माजी जिल्हा अध्यक्ष दिवंगत रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर हे अख्या जगाच निरोप घेतल्यामुळे मोरे परिवाराला मोठा धक्काच बसला काँग्रेसचे जेष्ठ नेते दिवंगत टाकळीकर हे उत्कृष्ट व्यक्तिमत्व असलेल्या पाटलांना टाकळी येथे अफाट जनसागराच्या उपस्थित निरोप देण्यात आला यावेळी मोठा जन समुदाय उपस्थित होता अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आली आहे 
तालुक्यातील मौजे टाकळी येथे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष दिवंगत रावसाहेब पाटील मोरे यांना यावेळी
 माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्यासह उपस्थित जन समुदायांनी टाकळीकर यांच्या अंत्यविधीच्या वेळी अनेक शोक संदेशात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली असून त्यांच्या आयुष्यातील गौरव कार्याला उजाळा देत सर्व राजकीय पक्षाच्या नेते मंडळीसह विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यानी भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे