Header Ads Widget

सामाजिक चळवळीतील अग्रणी व्यक्तीमत्व असलेले पत्रकार गंगाधर गंगासागरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऑनलाईन लेख प्रकाशित !


   
नायगाव फास्ट न्यूज / रुई बु )
अखिल भारतीय गुरु रविदास समता परीषदेचे जिल्हाध्यक्ष तथा नायगांव तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष जेष्ठ पत्रकार गंगाधर एम.गंगासागरे हे गुरु रविदास , फुले-शाहु-आंबेडकर यांसह महामानवांच्या विचारधारेला अनुसरुन  सामाजिक चळवळीत सदा अग्रेसर आसणारे अष्टपैलू व्यक्तीमत्व होय. त्यांचा आज ८ मे रोजी ५० वा वाढदिवस या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख प्रकाशीत करीत आसतांना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे .
श्रीयुत गंगाधरराव गंगासागरे यांची जन्मभुमी मन्याड नदी काठावरील  मावली ता.मुखेड मात्र त्यांची कर्मभुमी नरसी ता.नायगांव जि.नांदेड आहे . त्यांचा जन्म ८ मे १९७२ रोजी मावली येथे एका सामान्य चर्मकार कुटूंबात झाला त्यांच प्राथमिक शिक्षण जि.प. प्रा.शा. मावली व बेटमोगरा येथे झाले . १९८३ ला मन्याड नदीला महापुर आला आणि मावलीसह नदी काठावरील गावे होत्याची नव्हते झाली . ही नैसर्गिक आपत्ती कोसळल्याने त्यांचे आई-वडील यांनी संघर्षमय प्रवास करीत गाव सोडायचा निर्णय घेवून १९८४ ला नरसी येथे वास्तव्यास राहीले . त्यामुळे  नरसी या चौरस्त्याच्या ठिकाणी राहून पुढील शिक्षणासाठी नायगांवचे जनता हायस्कुल व शरदचंद्र महाविद्यालय येथून कला शाखेची पदवी मिळाली आहे
पदव्युत्तर शिक्षणासाठी नांदेड जिल्हा गाठला तेथील नेताजी सुभाष चंद्रबोस महाविद्यालयातून एम.ए.(लोकप्रशासन ) ही मास्टरडीग्री मिळविली . तदनंतर निवडमंडळ व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला . मात्र त्याकाळी वधारलेल्या वशीलेबाजीमुळे यश मिळाले नाही . तरीपण खचून न जाता आई-वडीलांनी काबाडकष्ट करुन शिकविलेल्या शिक्षणाचे सार्थक व्हावे या उद्देशाने पत्रकारीतेच्या क्षेत्रात सहभागी झाले . आणि मागील दोन तपांपासून सत्यप्रभा , लोकमत , पुण्यनगरी या वर्तमानपत्राच्या माध्यमातून सकारात्मक  पत्रकारीता करीत आहेत . त्यांना २०१२ या वर्षी परभणी येथील साहीत्य संमेलनात "गुरु रविदास लेखन पुरस्कार" मिळाला व २०१४  नांदेड येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तथा दै.समिक्षा मंथन ब्लड ग्रुपच्या वतीने ग्रामिण पत्रकार म्हणून गौरविण्यात आले आहे
तसेच १९ फेब्रुवारी २०२२ रोजी पुणे (कात्रज ) येथील गुरु रविदास मंदीर ट्रस्टच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले . दुसरी गोष्ट सामाजिक कार्य करीत आसतांना पत्रकार गंगाधरराव गंगासागरे हे मागील दहा वर्षापासून अखिल भारतीय गुरु रविदास समता परीषद या इंडीयालेवलच्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कार्य करीत आसतांना नांदेड जिल्हाध्यक्ष (ग्रामिण ) ही महत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत . जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य करीत आसतांना नरसी येथे मागील तीन वर्षापासून क्रांतीकारी महामानव जगतगुरु गुरु रविदास महाराज यांची जयंती समाज बांधवांना सोबत घेवून साजरी करीत आहेत . आणि आपल्या गावात नरसी येथे गुरु रविदास मंदीर बांधकाम झाले पाहीजे  यासाठी भावंडाना व समाजबांधवांना सोबत घेवून जोमाने कामाला लागले.अशा या अष्टपैलू व्यक्तीमत्वाला प्रगटदिनाच्या निमित्ताने मनस्वी अभिष्टचिंतन ! ! ! 
---   सुभाष पेरकेवार (पत्रकार),नरसी