गेल्या महिन्याच्या पाच तारखेला म्हणजे एप्रिल महिण्यात नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील रहिवासी असलेले व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची नांदेड येथे दिवसा ढवळ्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली असल्यामुळे नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नांदेड पोलिसानी अवैध विनापरवाना पिस्टल व तीक्ष्ण हत्यारे बाळगणाऱ्या लोकांचा शोध घेऊन एकीकडे मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहेत दुसऱ्या बाजूने विनापरवाना तलवारी खंजीर पिस्टल पोलिसांनी मारलेल्या धाडीत सापडताना दिसून येत असून कधी ऑटो चालकाकडे पिस्टल सापडतात कधी फायनान्स वाल्याच्या कार्यलयात पोलिसांच्या छापे मारी दरम्यान विनापरवानगी तलवारीसह खंजीर सापडत असल्यामुळे पोलिसासह जनसामान्य माणूस चक्रावून जाताना दिसून येत आहे
जिल्ह्यात सध्याच्या परिस्थितीत पाहिले तर दरोडे वाटमाऱ्या, चोऱ्या कमी प्रमाणात होत असताना दिसून येत असले तरी आत्ता नांदेड शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्याच्या ठिकाणी अवैधरित्या जीवघेणे हत्यारे सापडत असल्यामुळे पोलिसांनाही आरोपीला जेरबंद करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसून येत असून मोठया प्रमाणात कारवाईची होत असताना सुद्धा तीक्ष्ण हत्यारे सापडत असल्याचे चित्र दैनंदिन जनतेला व पोलिसांना पाहण्यास मिळत असून एवढा मोठा विनापरवाना तीक्ष्ण हत्याराचा साठा उपलब्ध झाला कुठून हे मुळ पोलिसांनी प्रथम शोधले पाहिजे असे जनतेचे मत असून नांदेड पोलीस जीवाची बाजी लावून सदरच्या कारवाह्या करत असल्याचा सवाल जनतेतून केला जात आहे नांदेड जिल्ह्यात जनसामान्य माणसा जवळ जर असे जीवघेणे शस्त्र सापडत असतील तर जनसामान्य माणसाचं काय असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे
नांदेड पोलीसानी आरोपीच्या विरोधात भारतीय हत्यार कायद्यानुसार अवैध शस्त्र बाळगणाऱ्या अनेकावर गुन्हे दाखल करीत असताना सुद्धा कायद्याची भीती जुगारून अवैध शस्त्र बाळगीत असल्यामुळे जनसामान्य जीवनमान धोक्यात आले असून कायाद्याची व पोलिसाची भीती जनसामान्य माणसाला असली तरी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या लोकांना नाही का ? असा ही प्रश्न चर्चाला जात असून असे तीक्ष्ण शस्त्र व पिस्टल तलवारी सर्रास वापत असल्याचे दिसून येत असले तरी पोलीस मोठया हिम्मत्तीने आरोपीसह विना परवाना शस्त्र ताब्यात घेत असताना पोलिसांना जीव धोक्यात घालावे लागत असून खरे तर एवढा विनापरवाना तीक्ष्ण हत्याराचा साठा आला तरी कुठून असा प्रश्न ग्रामीण भागातील जन सामान्य माणसाला भेडसावत असून नांदेड जिल्ह्याची ओळख आत्ता शस्त्र धारी नांदेड म्हुणुन होणार की काय ? असा ही प्रश्न ग्रामीण भागातील जनतेला पडला आहे
