Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत घडलेल्या त्या आपघातातील नांदेड येथील दवाखान्यात उपचारा दरम्यान कापसी ( बु ) येथील रहिवासी असलेले केरबा काशीराम तेलंगे यांचा मृत्यू --

नायगाव फास्ट न्यूज / मारताळा - बालासाहेब शिंदे 
-----------------------------------------------------------
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गवर असलेल्या घुंगराळा जवळ टिप्पर क्रमांक,एम एच ०४ सी यू ८५६८
टीपरच्या चालकाने अचानक ब्रेक मारल्यामुळे टेम्पो क्रमांक,एम एच २६ ए डी ३३८९ टेम्पोची धडक टिप्परला पाठी मागून जोराची लागली असल्यामुळे टेम्पोतील एक ठार तर दोन जखमी झाल्याची घटना दि ०५ मे  रोजी संध्याकाळी दहा ते साडे दहा वाजण्याच्या सुमारास घुंगराळ्या जवळ घडली होती 
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कहाळा येथील व्यापारी गोविंद यादव चक्रधर वय ४० हे जागीच ठार झाले  होते तर दोन जण गंभीर जखमी झाले होते नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या घुंगराळा येथे दिनांक ५ मे २०२२ रोजी हा अपघात झाला होता सदरच्या अपघातात मयत गोविंद यादव चक्रधार हा 
जागीच ठार झाला होता तर सदरच्या अपघातात केरबा काशीराम तेलंगे, व बालाजी किशन मोदपवाड हे गंभीर जखमी झाले होते परंतु या जखमीतील केरबा काशीराम तेलंगे यांचा उपचारा दरम्यान दवाखान्यात मृत्यू झाला असून लोहा तालुक्यातील कापसी (बु) ,येथील रहिवासी केरबा काशीराम तेलंगे वय वर्षे (७०) यांचा देखील उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचे सांगण्यात आले आहे 
नायगाव येथील आठवडी बाजार आटोपून गावाकडे जात असताना नांदेड ते नायगाव महामार्गावर रात्री दहा ते साडे दहाच्या सुमारास घुंगराळा येथे टेेंपो व टिप्पर या दोन वाहनात  जोराची धडक झाल्यामुळे ते गंभीर जखमी झालेले होते.त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड़ येथील शासकीय दवाखान्यात   दाखल करण्यात आलेले होते .दि.७ रोजी रात्री ११.४५ च्या सुमारास उपचारा दरम्यान त्यांचे मृत्यु झाला.त्यांच्या पार्थिवावर दि.०८ रोजी दुपारी दोन वाजता कापसी (बु) येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, तीन मुली, सुना,नातू,असा परिवार आहे.सामाजिक कार्यकर्ते भुजंग तेलंगे व बालाजी तेलंगे यांचे ते वडील होत.