Header Ads Widget

ग्रामीण भागात रखरखत्या उन्हात शुभमंगलम धुमधडाक्यात गेल्या वर्षी पेक्षा यंदा लग्न सोहळे मोठ्या थाटात ! --


         माधव पवार 
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पाहिले तर यंदा मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे मोठया थाटात पार पडत असल्याचे दिसून येत असून तब्बल दोन वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटाचा विचार करून ग्रामीण भागातील नागरिक लग्न सोहळे करण्यासाठी वचकत होते आणि शासनाने सुद्धा नियमावली काढून ठेवली होती तरी साधारणता शुभ मंगलम करण्यात आले असले तरी रात्री-बेरात्री आपल्यावर पोलीस कार्यवाही होऊ नये म्हणून थोडक्यातच सोयरे धायरे बोलावून शुभमंगल उरकून घेत होते कोरोना महामारीचे संकट वसरल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या थाटात लग्न कार्य संपन्न होताना दिसून येत असून सोयराकी मोठया प्रमाणात करण्यात आल्या असल्यामुळे लग्न सोहळे जोरदार करण्यात येत आहेत 
गेल्या दोन वर्षा पासून कोरोना महामारीमुळे शुभमंगल करण्यात आले नाही शासनाने गेल्या दोन वर्षात काळात लॉकडाऊन सतत लागू करण्यात आले होते त्या काळात ग्रामीण भागातील जनता ही मोठया प्रमाणात चांगलीच वैतागली होती या सदरच्या काळात अतिशय महत्त्वाची कामे व लग्न सोहळे खोळंबली होती परंतु सध्याच्या परिस्थितीत वातावरण समाधान कारक असल्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पाहिले तर यंदा रखरखत्या उन्हात सुद्धा शुभमंगल मोठ्या थाटात होताना दिसून येत असूनसोयरिकीचा ही दर्जा पाहिला तर अतिशय वेगाने लग्न सोहळे जमत असल्यामुळे लग्न ही मोठ्या उत्सवात साजरे होताना दिसून येत आहेत
ग्रामीण भागात मागील काही महिन्या पासून वधुच्या शोधात वरा कडील मंडळी होती तर वराच्या शोधात वधू कडील मंडळी होती आणि एकमेकांच्या पसंती नुसार वधू-वर लाईक करून सोयरिकी लग्न सोहळे जमविण्यात आले असून शुभमंगल सुद्धा धुमधडाक्यात संपन्न होताना दिसून येत आहेत व लग्न संपन्न होताना दिसून असून खरे तर लग्न सोहळे हे मानवाच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचे घटक व प्रसंग असल्यामुळे लग्न सोहळे हे दर्जेदार होताना दिसून येत असून  ग्रामीण भागात लग्न सोहळा संपन्न होताना मोठ्या थाटात होताना पाहवयास मिळत आहे