नायगाव फास्ट न्यूज / रामराव ढगे :-
नायगाव पंचायत समितीच्या सभापतीची व उपसभापतीची मुदत संपल्यामुळे सदरची पंचायत समिती प्रशासकीय झाल्यामुळे या पंचायत समितीला एकोण नव्वद गावाचा कारभार पाहण्यासाठी प्रशासनाचे नियंत्रण असताना सुद्धा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात कामे
खोळंबली असल्यामुळे सदरच्या शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे या पंचायत समितीला मुख्य कारभारी म्हणजे सभापती व उपसभापती नसल्यामुळे येथील अधिकाऱ्याचा व कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात बेजबाबदारपणा वाढल्यामुळे शेतकरी बांधवाला नको त्या अडचणीच्या कामाला सामोरे जावे लागत आहे
नायगाव पंचायत समितीचा कारभार म्हणजे उंटावर बसून शेळ्या आपल्या सारखा असल्याचे ही सदरील जनतेसह शेतकऱ्यांतून बोलल्या जात असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे पंचायत समिती सुद्धा तेवढाच वेळ प्रशासकीय यंत्रणेने नुसार काम पाहत राहतील असे असले तरी शेतकऱ्याच्या कामात मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे सध्या तरी जनतेतून बोलल्या जात असून एवढ्या मोठ्या कडाक्याच्या उन्हाळ्यात सुद्धा अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली असताना ही पंचायत समितीच्या प्रशासकीय यंत्रणेने पाणी टंचाईच्या संदर्भात तसा कोणता ठोस निर्णय घेतला नसल्याचे ही सदरच्या पाणी टंचाई वरून दिसून येत आहे
