माधव पवार
नायागांव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या काहाळा बु येथील रहिवासी असलेल्या एका तरुणांनाला गुजरात राजस्थान मॅचवर सटा जुगार खेळताना कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या आदेशानुसार फौजदार दिनेश येवले यांनी छापा यशस्वी केले आहे
मार्गदर्शनाखाली फौजदार संजय अटकोरे आणि त्यांच्या पोलीस टीमने आयपिएलवर सटा लावणारा आरोपी शेख करीम मोदीन उर्फ निसार पिता हुस्सेन यांना कुंटूर पोलिसांनी रंगेहात पकडले असल्याची घटना दिनांक २४ मे २०२२ संध्याकाळी ठीक ११ वाजण्याच्या दरम्यान काहाळा येथे घडली असल्याचे ठाणे अंमलदार साईनाथ शिंदे यांनी दिली असली तरी पोहेका निखाते पोलीस नाईक कंधारे, पोलीस शिपाई घुमे,भार्गव सुवर्णकार यांनी पकडले आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे काहाळा बु येथे महाराष्ट्र सोडून बाहेर राज्यात म्हणजे गुजरात विरोध राजस्थान येथे आयपीएलच मॅच चालू असताना काहाळा येथील रहिवासी असलेला आरोपी शेख करीम मोदीन उर्फ निसार हुस्सेन यांनी आयपीएल मॅचवर सटा जुगार खेळताना ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या पोलीस टीमला मिळून आल्यामुळे त्या आरोपी कडून अटक करण्यात आले आहे
एक लॅपटॉप तीन मोबाईल यांची किंमत ५५ हाजार रुपये तर नगदी १ हजार दोनशे ४० रुपये मिळून आल्याचे कुंटूर पोलिसांनी सांगितले असून सदरच्या कारवाईत फिर्यादी दिनेश येवले ठाण्यात तक्रार दिल्या वरून आरोपीच्या
विरोधात पो स्टे ला गु र न ९०/२२ कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व अटक करून नोटीस देऊन सोडण्यात आल्याचे समजते सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संजय अटकोरे हे पुढील तपास करीत आहे
