नांयगाव :-- बाळासाहेब पांडे
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास योजना या योजनेतून देगाव,बेटक बिलोली,घुंगराळा या गावाच्या विकास कामांसाठी प्रत्येकी सात लक्ष असे एकूण एकवीस लक्ष रुपयांचा निधी प्राप्त करून घेतला असून अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी दिली असल्यामुळे आता बऱ्याच पैकी गावाचा विकास होणार असून सदरचा ग्रामीण राजकीय पुढारी असला तरी त्यांची राजकीय वर्तुळात चांगले वजन असल्यामुळे सदर परिसरातील गावच्या विकासासाठी निधी खेचून आणण्याचे काम वसंत पाटील सुगावे यांनी करत असल्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे
या सदरच्या निधीं संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गावचे उपसरपंच वसंत सुगावे पाटील यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. ना.धनंजय मुंडे यांच्याकडे काही दिवसांपासून सतत पाठपुरावा केला होता. त्यानंतर ना. मुंडे यांनी एकवीस लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला असल्यामुळे लवकरच या कामांची सुरुवात करण्यात येईल या निधीतून गावातील सिमेंट कॉन्क्रीट रस्ते व नाली बांधकाम ही कामे करण्यात येणार आहेत. तसेच येत्या काही दिवसांत आणखीन निधी मंजूर करून आणू असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी नायागांव फास्ट न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे
