Header Ads Widget

गडग्या सारख्या ग्रामीण भागातील कु.नजमा बनली पहिली डॉक्टर नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने अभिनंदन !!!


नायगाव / बाळासाहेब पांडे :-

शिक्षण हे वाघीनीचे दुध असल्यामुळे या सदरच्या दुधातुन केलेली मेहनत फळाला आली असल्यामुळे 
जिद्द आणि चिकाटी व परिश्रमातून डॉ.नजमा हुसेन शेख हिने वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस पदवी प्राप्त करून,महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील मातीत ही वैद्यकीय क्षेत्राचे धडे घेऊन यश मिळवण्याचे सामर्थ्य असल्याचे चित्र दाखवून दिले असून कु.नजमा हिने मिळवलेल्या यशस्वी पदवीने नायगाव तालुक्यातील गडगा गावची पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान तिला मिळाला असल्यामुळे नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने डॉ महिलेचे अभिनंदन करण्यात येत आहे.
तालुक्यातील गडगा येथील रहिवासी असलेल्या महिला डॉ कुमारी कु.नजमा नुकताच नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित पदवीदान समारंभात तिला पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.गडगा येथील नाथोबा विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक हुसेन शेख यांची ती कन्या आहे. त्यांचा एक मुलगा मुंबईच्या पोलीस महासंचालक कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. अतिशय जिद्द, चिकाटी व परिश्रमातून या कुटुंबाने यश संपादन केले. तिच्या यशाचे आई, वडील, भाऊ तसेच गडगा गावच्या ग्रामस्थांनी अभिनंदन करीत स्वागत केले आहे.