माधव पवार
गेल्या लोकसभा निवडणूकीसह विधानसभेच्या निवडणूका पार पडल्याच्या नंतर नायगाव विधानसभा मतदार संघाची जशास तसी समस्या कायम असल्यामुळे या विभागाचा विकास कोणत्या पद्धतीने होईल यांचे ज्वल्लंत उदाहरणं देण्यासारखे असल्यामुळे जनते समोर असून जिल्ह्यात नेते मंडळी कडून कोणत्या कोट्यातुन निधी प्राप्त होतो ते त्यांनाच माहिती असले तरी ग्रामीण भागात विकास कामाचे उदघाटन ही करण्यात आले परंतु कुठेच विकाची कामे चालू नसल्यामुळे प्राप्त झालेला कोट्यावधीचा निधी खोटा की त्या निधीचा विकास खोटा अशी म्हण्याची वेळ आता जनतेवर आली असून विकासाचे नारळ फुटले तरी कामाचा बे पत्ता असल्याचे दिसून येत आहे
निवडणूक विभागाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका वरचेवर लांबणीवर घालत असल्यामुळे त्या निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा झाला पाहिजे हा डोळस विचार डोळ्यासमोर ठेवून नेते मंडळी भक्कम निधी आल्याचे सांगत असले तरी सदरची कुठून आला आला तरी विकासाला का बोगदाड पडले सदरच्या निवडणुकी पूर्वी कोट्यावधीचा निधी वाटप करणे म्हणजे झाडाला पैसे लागलेत की काय असा प्रश्न ही जनतेतुन चर्चेला जातं असला तरी नायगाव विधानसभा मतदार संघात गेल्या दीड दोन वर्षाखाली कोट्यावधी रुपयाच्या निधीचे फलक लावण्यात होते परंतु प्रतीक्षात कोणत्या गावात किती विकास झाला यांचा अंदाज लागत नसल्याचे चित्र आहे
