नायगाव / नागेश कल्याण
नायागांव तालुक्यातील खैरगाव येथील रहिवाशी असलेले दिवंगत दाजीराव माधवराव पोलीस पाटील शिंपाळे खैरगावकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त खैरगाव येथे दिनांक ५ मे २०२२ रोजी गुरुवारी रात्री ठीक ८ वाजून ३० मिनिटां पासून ते ११.३० वाजता सुप्रसिद्ध किर्तनकार भागवताचार्य ह.भ.प. चंद्रकांत महाराज लाठीकर यांच्या नामसंकीर्तनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सहशिक्षक शंकर दाजीराव पा शिंपाळे यांनी दिली यांनी दिली असून सदरील कीर्तनाचा लाभ नायागांव तालुक्यासह ग्रामीण भागातील जनतेसह भाविक भक्तांनी घ्यावे असे आवाहन करण्यात आले असून खैरगाव येथील दिवंगत दाजीराव पाटील शिंपाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त ह भ प चंद्रकांत महाराज लाठीकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे
तालुक्यातील मौजे खैरगाव येथील दिवंगत दाजीराव पाटील हे परिसरातील शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून सर्व परिचित होते कोरोना महामारीच्या संकटाने शिंपाळे परिवार अचानकपणे आघात झाला होता व त्यांचे गेल्या वर्षी निधन झाले होते पाहता पाहता या घटनेची वर्षपूर्ती ही होत असल्याने खैरगावकर व शिंपाळे कुटुंबीय अजून ही त्यांच्या आठवणीत सात त्याने चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत असून यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने त्यांच्या कार्यास मायेची व ममतेची झालर व उजाळा मिळावा या हेतूने पाच मे रोजी चंद्रकांत महाराज लाठीकर यांच्या नामसंकीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या हरिकीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन शिंपाळे पाटील परिवार व समस्त खैरगावकर यांच्या वतीने करण्यात आले आहे
