Header Ads Widget

सावरखेड गावाचा अनेक वर्षा पासून विकास खुंटला असला तरी विकास करण्यासाठी सरपंच सक्षम असताना सुद्धा ग्रामसेवक का ? माहिती देण्यास १५ दिवसा पासून टाळाटाळ करतोय ! ••


नायगाव फास्ट न्यूज /  माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे सावरखेड ग्रामपंचायत कार्यालयाच्या गावविकासाच्या संदर्भात गावचे ग्रामसेवक माने यांना गेल्या पंधरा दिवसा गावाच्या विकासाच्या संदर्भात गेल्या १५ दिवसा पासून माहिती मिळविन्याचा प्रयत्न करीत असताना सुद्धा गावाचे ग्रामसेवक यांनी माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे वास्तव चित्र असून ग्राम सेवकाला अनेक वेळा संपर्क करून सदरची माहिती आज देतो उद्या देतो म्हणून एकदरीत १५ दिवसाचा चांगलाच वेळ मारून नेला असून सावरखेडचा विकास करण्यासाठी येथील सरपंच सक्षम असताना सुद्धा विकासाला का खिळ बसत आहे असा प्रश्न चर्चेला जात असून विकास कामे करण्यासाठी गावचे ग्रामसेवक यांचे सहकार्य मिळत नाही का अशी चर्चा होताना मिळत असून खरे तर ग्रामसेवका कडून या गावची माहिती देण्यास ग्राम सेवक टाळाटाळ करीत आहे
तालुक्यातील सावरखेड ग्रामपंचायतच्या अंतर्गत असलेल्या गावातील नाल्या तुंबल्या असून नूतन नाल्याचे बांधकाम करण्यात आली नसल्यामुळे गावचे पाणी रस्त्याने अधून मधून वाहताना दिसून येते गावातील समशान भूमीचे काम सुद्धा अर्धवट अवस्थेत असल्यामुळे गावच्या विकासाला गेल्या अनेक वर्षापासून खिळ बसत असल्याचे चित्र वास्तव दिसून येत असून गावचे घाण पाणी सुद्धा नाली बांधकाम करण्यात आले नसल्यामुळे उघड्या नाल्यानी व रस्त्यानी वाहताना दिसून सदरचे घाण पाणी मारोती मंदिराच्या समोरून वाहत असताना सुद्धा नाली बांधकाम करण्यात येत नसल्यामुळे सदरच्या ग्रामसेवकानी ग्रामपंचायतला कार्यालयाना नायगाव पंचायत समितीच्या विविध योजने अंतर्गत निधी आला नाही का असा प्रश्न केला जात असून सदरची माहिती सांगण्यासाठी ग्रामसेवकानी गेल्या पंधरा दिवसां पासून माहिती देण्यास सरळ सरळ नकार दिल्याचे समजून आले आहे
सावरखेड ग्रामपंचायत कार्यालयांना शासनाचा निधी म्हणजे २५.१५ चा निधी १४ व्या वित्त आयोगाचा निधी १५ व्या वित्त आयोगाचा निधी अथवा जिल्हा परिषद यांच्या कडून निधी सदर ग्रामपंचायतला प्राप्त झाला किंवा नाही हे सांगण्यासाठी गावचे ग्रामसेवक माने यांनी टाळाटाळ करीत असल्यामुळे सदरच्या गावाची संपूर्ण माहिती मिळत नसल्यामुळे खरच गावाला शासनाचा निधी का प्राप्त झाला नाही अथवा झाला असेल तर गावचा विकास गाव केला जात नाही गावातील नाल्याचे बांधकाम का केले जात नाही रस्त्यावरून पाणी वाहताना दिसत असताना दिसून येत असताना सुद्धा नाल्या का तुंबल्या अशा अनेक समस्यांनी सावरखेड गाव हे अनेक वर्षापासून समस्यांच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत तालुक्यातील अनेक गावात गावच्या विकासासाठी विविध योजनेचा निधी असल्यामुळे गावाअंतर्गतचे कामे केल्या जात असताना सुद्धा सावरखेड ग्रामपंचायतला शासनाचा निधी प्राप्त झाला नाही का ? असा प्रश्न चर्चेला जातं आहे