नायगाव तालुक्यातील मौजे टाकळगाव येथील रहिवासी असलेले व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या विविध कृषी महोत्सवास सहभाग घेऊन शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या मार्फत विविध पुरस्कार दिले जातात त्याच धर्तीवर कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०१८,२०१९,२०२० या तीन वर्षीय राज्य पुरस्कार सन्मान सोहळा नाशिक येथे दिनांक २ मे २०२२ रोजी विशेष मान्यवरांच्या उपस्थित पार पडला असून मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मौजे टाकळगाव येथील छोट्याशा गावातील एक उत्कृष्ट शेतीनिष्ठ शेतकरी धोंडीराम ईरवंत सुपारे यांना सन २०१८ सालाचा उद्यान पंडित राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला असल्यामुळे प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे
तालुक्यातील टाकळगावचे रहिवासी असलेले उत्कृष्ट जेष्ठ धोंडीराम सुपारे शेतकरी सदरच्या या पुरस्कार सोहळ्याला माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,मा. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादाजी भुसे,फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, सहकार कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, प्रधान सचिव श्री एकनाथ डवले, कृषी आयुक्त श्री धीरज कुमार आदींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे
तालुक्यातील मौजे टाकळगाव येथील छोट्याशा खेडे गावांत वास्तव्यास असलेले धोंडिबा ईरवंत सुपारे यांची शेती विषयी अंत्यत निष्ठा, विविध प्रयोग करण्याच्या जिद्दीच्या बळावर शेतकऱ्यांनी अक्षरशः शेती क्षेत्रात धमाल कामगिरी बजावली असल्यामुळे त्यांनी आपल्या गावात अनेक शेतकऱ्यांना सोबत घेऊन आत्मा प्रकल्पाच्या अंतर्गत जय किसान शेतकरी गट स्थापन केला असल्याने त्याच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम राबविले त्यामुळे त्यांना व त्यांच्या शेतकरी गटाला विविध ठिकाणी कृषी पुरस्कार प्राप्त झाले असूम विविध ठिकाणी होणारे कृषी महोत्सव यात त्यांनी विशेष सहभाग नोंदवला असून पुरस्कार प्राप्त शेतकरी सुपारे यांची बरदापुर जिल्हा पुणे येथे नर्सरी ही असून लातूर येथे टिशू कल्चर लॅब आहे. तर टाकळगाव येथे शेडनेट हाऊस मध्ये शोभेची रोपे व फळझाडे आहेत. त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे
शेतकरी धोंडीराम इरवंता सुपारे यांना प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक पद्धतीने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन २००९ ते १० रोजीचा जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने देण्यात येणारा कृषीनिष्ठ पुरस्कार देण्यात आला असुन सन २०११ मध्ये कृषी विभागाच्या वतीने आयोजित माळेगाव यात्रेत त्यांच्या हळद पिकास तृतीय क्रमांक मिळाला होता सन २०१७ मध्ये जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने लिंबू फळास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते २०१८ मध्ये कृषी विभाग म्हाळसाकांत यात्रा कृषी महोत्सवात हळद पिकास तृतीय पारितोषिक मिळाले वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था नागपूर यांच्या वतीने कृषी यांत्रिकीकरण शेतकर्यांचे सक्षमीकरण या कार्यशाळेत सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले असून कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या वतीने सन २०२० मध्ये नाविन्यपूर्ण अवजार निर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते
