Header Ads Widget

राजकारणातील अष्टपैलू राजकारणी काँग्रेसचे जिल्हा परिषदचे दिवंगत रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर काळाच्या पडद्याआड ••


नायगाव फास्ट न्यूज / माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे टाकळी येथील रहिवासी असलेले तथा काँग्रेसचे माजी जिल्हा परिषदे माजी अध्यक्ष दिवंगत रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांचे अल्पशा आजाराने नांदेड येथे निधन झाले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे ते कट्टर समर्थक होते राजकारणातील अष्टपैलू राजकारणी असलेले रावसाहेब मोरे टाकळीकर हे दिनांक ७ मे २०२२ रोजी काळाच्या पडद्याआड गेले असल्यामुळे सर्व राजकीय स्तरातून त्यांच्या निधना बदल शोक व्यक्त केला जात असून मनोज पाटील मोरे टाकळीकर यांचे ते वडील होते टाकळीकर यांच्या निधनाची वार्ता सर्वदूर वारऱ्यासारखी पसरली आहे
तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी असलेले माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिवंगत रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यासह तालुक्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास झाला ग्रामीण भागात गुत्तेदार ह्या नावाने जास्तीचे परिचयात होते दिवंगत रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर यांच्या निधनाने काँग्रेस प्रणित कार्यकर्त्यांना निधनाची वार्ता कळताच धक्काच बसला असल्याचे अनेकांच्या तोंडून ऐकावयास मिळाली असल्याचे दिसून आले असून दिवंगत मोरे पाटील हे सकाळी काहाळा येथे असल्याचे सांगण्यात आले असल्याले तरी अचानक तब्येत मोरे यांची बिघडल्यामुळे नांदेड येथे नेण्यात आल्याच्या नंतर माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिवंगत रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर हे काळाच्या पडद्याआड गेल्याचे वार्ता सर्वत्र पसरली आहे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेस पक्षात काम करणारे व पक्षाला बळकट करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे काँग्रेसचे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नेते दिवंगत रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर हे काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे मोरे परिवाराला दुःखाच्या डोंगरात बुडावे लागले असून टाकळीकर यांची कारकीर्द पाहिली तर अनेक विकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा त्यांनी चांगल्या प्रकारे विकास केला अनेक निवडणुकीमध्ये आपले उमेदवारी दाखल करून अनेक वेळा निवडून आले त्यांच्या कारकिर्दीला व त्यांच्या कार्याला नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे

शोक संदेश माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार यांच्या कडून •••
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रावसाहेब पाटील मोरे यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायी बालाजी बच्चेवार - रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर हे हसत खेळत कुठलाही मोठेपणाचा आव न आणता सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे व्यक्ती म्हणून सर्व तालुक्याला परिचित आहेत. रावसाहेब पाटील मोरे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांच्यासोबत मला काम करण्याचा योग आला एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा त्यांनी कुठलाही बडेजावपणा केला नाही त्यांची तब्येतही चांगले असताना अशा अचानक जाण्याने नायगाव तालुक्याचा फार मोठं नुकसान झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो व त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना