नायगाव फास्ट न्यूज / माधव पवार
नांदेड जिल्ह्यातील वसरणी येथील रहिवासी असलेले व सध्या हल्ली मुक्काम भोकर येथे वास्तव्यास असलेले वसरणीचे भूमीपुत्र विजयकुमार पांडुरंग मोरे यांची नुकतेच तालुका भोकर येथे विशेष मान्यवराच्या उपस्थित काँग्रेस प्रणित राष्ट्रीय काँग्रेस परिवारचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहम्मद उमर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ६ मे २०२२ रोजी नियुक्ती पत्र देऊन राष्ट्रीय काँग्रेस परिवार पक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी मोठया सन्माननाने निवड करण्यात आली असल्यामुळे त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन करण्यात येत आहे
राज्यात काही महिन्यात आघामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागत असल्यामुळे व ग्रामीण भागासह जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी काँग्रेस प्रणित राष्ट्रीय काँग्रेस परिवारच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी विजयकुमार मोरे वसरणीकर यांची निवड करण्यात आली निवड करण्या मागचा उद्देश असा की या माध्यमातून जनतेचे प्रश्न व समस्या मोठया प्रमाणात सोडविण्यासाठी व समाधान हेतू तसेच समाजासाठी त्यांची प्रामाणिक व कृतव्यनिष्टा पाहून व दिन दुबळे, गरीब, कमकुवत लोकाना सहकार्याची भावना ठेवण्यासाठी सदरची भोकर येथे मान्यवरांच्या उपस्थित निवड करण्यात आली आहे
नांदेडचे वासरणी येथील रहिवासी असलेले विजय पांडुरंग मोरे यांची निवड मोठया आदराने करण्यात आली त्यांच्या या निवडी बद्दल मित्र परिवार व विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून सदरचे कार्य प्रामाणिक पणे पार पाडण्याची जबबादारी आता विजय पांडुरंग मोर यांच्यावर विशेष मान्यवरानी सोपवली असल्यामुळे सदर कार्य पार एकनिष्ठ पाडणार असल्याचे मत काँग्रेस प्रणित राष्ट्रीय काँग्रेस परिवारच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी विजयकुमार मोरे वसरणीकर यांची निवड झाल्याच्या नंतर नायगाव फास्ट न्यूजशी सांगितले आहे
