माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव बाजार येथे तालुका मराठी पत्रकार संघांचे दोन गट निर्माण झाल्यामुळे व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित होण्यासाठी आप आपल्या गटाच्या पत्रकाराचे शक्ती प्रदर्शन करीत दिनांक ६ मे २०२२ रोजी गंगाखेडला रवाना झाले असल्याचे वास्तव चित्र दिसून आले असून जसे राजकीय मंडळी निवडणुकीचा प्रोग्राम लागल्याच्या नंतर आपल्या नेत्यालाvआपल्या पाठीमागची लोकसंख्या दाखवित मोठा वहानाचा ताफा घेऊन ----------
शक्ति प्रदर्शन करतात तशाच पद्धतीने नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या दोन्ही गटाकडून शक्ती प्रदर्शन करताना दिसून आले असून नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाला मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार हा पत्रकारांना सन्मानित करण्यासाठी देण्यात आला असला तरी तालुका मराठी पत्रकार संघात मीनी राजकारणात होत असल्याचे दिसून येत आहे
नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत सोनखेकर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर लखपत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी यांना तालुक्याच्या अध्यक्ष पदावर विराजमान करण्यात आले तर दुसर्या गटाचे नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे --------
तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष माधव मामा कोकुर्ले जेष्ठ पत्रकार माधव चव्हाण ज्येष्ठ पत्रकार एस एम मुदखेडकर यांच्या नेतृत्वाखाली नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नागेश कल्याण यांच्या हातात नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाची धुरा देण्यात आली पत्रकार संघ एक मात्र गट दोन असल्यामुळे राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी दोन्ही गटाचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच मान्यवर गंगाखेडला रवाना झाल्याचे दिसून आले आहे
