Header Ads Widget

पत्रकारितेच्या माध्यमातून कुठल्या ही घटनेत पत्रकार वाचा फोडण्याचे काम करतो माजी आमदार वसंतराव चव्हाण !!



नरसी : दिलीप वाघमारे 
गेल्या तीस वर्षांपूर्वी " दर्पण " म्हणजे काय हे नागरिकांना माहीत नव्हते.मात्र नायगावाचे पत्रकारांनी जिल्ह्यातील जेष्ट पत्रकारांना १९९२ दरम्यान माझ्या सिनेमा टॉकीज मध्ये पत्रकारांचा मेळावा आयोजित करून दर्पण म्हणजे समाजाचं आरसा अन् चौथा आधारस्तंभ असतो हे माजी जिल्हाध्यक्ष सोनखेडकरांनी दाखवून दिले.  तेव्हा पासून पत्रकारांच्या लेखणीच्या माध्यमातून विकास काम बरोबरच सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागतात हे नायगाव तालुक्यातील पत्रकारांनी वेळोवेळी कुठल्याही घटनेत पत्रकार हा वाचा फोडण्याचे काम करतो. म्हणून आज नायगावाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला या गोष्टीचा मला अभिमान वाटतो असे मत माजी आ.तथा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केला आहे 
नायगांव मराठी पत्रकारसंघास राज्यस्तरीय स्व.वसंतराव काणे हा पुरस्कार मिळाल्याचे औचित्य साधून १५ मे रोजी नायगांव विधानसभेचे लोकप्रिय नेतृत्व माजी आ.वसंतराव चव्हाण कुंटुंबियांकडून पुरस्कार विजेते यांचा सन्मान व गौरव सोहळा मोठ्या थाटात आयोजन केले होते.याप्रसंगी मराठी पत्रकारसंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप नागपूरकर, माजी जिल्हाध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर,प्रभारी लक्ष्मण भवरे, प्रभाकर लखपत्रेवार,गंगाधर भिलवंडे, तालुकाध्यक्ष गजानन चौधरी, तालुका सरचिटणीस दिलीप वाघमारे,तर प्रमुख उपस्थिती माजी जि. प.सदस्य माधवराव बेळगे, नायगावाचे नगराध्यक्ष प्रतिनिधी नारायण जाधव, श्रीनिवास चव्हाण,हणमंतराव चव्हाण, प्रा.रविंद्र चव्हाण, प्रा.बाबासाहेब शिंदे,माणिक चव्हाण, संजय चव्हाण,रमेश शिंदे,डॉ विश्वास चव्हाण,श्रीधर चव्हाण,पंकज चव्हाण, गजानन चव्हाण, तमलूरे सह चव्हाण कुंटुंबियांची आवर्जून उपस्थिती होती.
पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात पुढे बोलताना माजी आ.वसंतराव चव्हाण म्हणाले, पत्रकार हा नेहमीच काही गोष्टीला वाचा फोडण्याचे काम करतो.वाचा फोडीत असतांना व वास्तव लिहीत असताना ती घटना कोणाच्या जिव्हारी लागेल, न लागेल याचा विचार कोणीही करू नये.मी गेल्या ३० वर्षांपासून सातत्याने सामाजिक आणि लोकाभिमुख कामे करीत असताना माझ्या काही चुका झाल्या तेव्हा माझ्या विरुद्ध पत्रकारांनी ठामपणे लिखाण केले.मात्र मी कधीही कोणाला बोलवून असे कां लिहिले असे विचारले नसून माझ्या तालुक्यातील पत्रकारांना राज्यस्तरीय बहुमान मिळाला याचा मला अभिमान वाटतो असे वसंतराव चव्हाण यांनी आवर्जून सांगितले.आयोजीत या कार्यक्रमास गंगाधर भिलवंडे,मनोहर तेलंग, सुभाष पेरकेवार, रामप्रसाद चन्नावार, रामराव ढगे, गंगाधर गंगासागरे, पंडीत वाघमारे,  गोंविंद नरसीकर,आदीसह पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते 
कुंटुरचे अनिल कांबळे, मनोहर मोरे, शिवाजी पन्नासे, लक्ष्मण बरगे, शेषराव कंधारे, मारोती बारदेवाड, प्रकाश महीफळे, शेषराव बेलकर, साहेबराव दसाडे, श्याम गायकवाड,मधुकर जवळे, नीळकंठ जाधव, सहदेव तूरडवाड, किरण वाघमारे, सय्यद अजिम, आनंदा डाकोरे,विश्वाबंर वन्ने, माधव पवार ,गोडगेवार, परमेश्वर कदम,बालाजी हानमंते, शिवाजी पन्नासे,हणमंत वाडेकर,मनोहर मोरे,इनामदार,आदींची उपस्थिती होती.सुरखे सूत्रसंचालन दत्ता मामा येवते यांनी केले तर आभार प्रा.रवींद्र चव्हाण यांनी मानले