Header Ads Widget

नांदेड जिल्ह्यासह ग्रामीण भागात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती गावागावांत अभिवादन घराघरात बालाजी पाटील नारे यांचे आवाहन !


नायगाव फास्ट न्यूज /  माधव पवार 

नांदेड जिल्ह्यासह ग्रामीण भागात दिनांक ३१ मे २०२२ रोजी पुण्यश्लोक राजमाता लोकमाता रणरागिणी कर्मयोगिनी महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती प्रत्येक गावागावांत अनुयायांनी  साजरी करण्यात यावे असे आवाहान प्रदेश सरचिटणीस धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य बालाजी पाटील नारे यांनी केले असून सरकारी परिपत्रकानूसार प्रत्येक शासकीय कार्यालयात ही सदर ची जयंती साजरी करण्यात यावे आपापल्या गावातील  कार्यालयाच्या प्रमुखांना आता पासून सदरच्या अनुयायांनी सांगावे असे ही आवाहन करण्यात येत असून प्रत्येकाने आपल्या घरी राजमाता यांच्या प्रतिमेस,पुष्पहर घालून जयंती सोहळा साजरा करावा असे बालाजी पाटील नारे यांच्या कडून करण्यात येत आहे 
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागातील जयंती महोत्सव मंडळानी निश्चित पणे मोठ्या प्रमाणात दरवर्षी जयंती साजरी  करतात त्यामध्ये प्रबोधनात्म संदेश जाईल अशा एका व्याख्यानाचा ही समावेश करण्यात यावा नायगाव तालुक्यातील कोकलेगांव येथे जयंती ढोल तासाच्या
गजरात मिरणुक काढण्यात येणार असल्यामुळे गावांत अन्नदान करुन सणा प्रमाणे जयंती साजरी केली जाते  घरासमोर रांगोळी काढून होळकर शाहीचे "बांड" निशाण घरावर फडकवून जयंती साजरी करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी करावे असे बालाजी पाटील नारे सांगितले असून मुलांना सुट्टीअसल्यामुळे होळकर शाहीची लहान लहान पुस्तके वाचण्यासाठी जयंती सोहळ्याच्या निमित्ताने मार्ग दाखवा असे ही यावेळी आवाहन करण्यात येत आहे