नायगाव तालुक्यातील मोजे रुई बु येथे अचानक लागलेल्या आगीत तीन शेतकऱ्यांचा कडबा जळून भस्मसात झाल्यामुळे बैलाचा प्रश्न गंभीर बनला असल्याने भाजपा पक्षाचे नरसी जिल्हा परिषद गटाचे विद्यमान जिल्हा परिषदेचे सदस्य माणिकराव लोहोगावेयांच्या माध्यमातून जिल्हा परिषद नांदेड यांच्या कडून शेतकऱ्यांना बैलांच्या वैरणासाठी तात्काळ मदत मिळवून देण्याची ग्वाही नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिली असून रुई बुद्रुक येथील शेतकऱ्याच्या शेतातील झोपड्यासह शेतीचे औजारेआणि कडबा परिपूर्ण जळून राख झाली असल्यामुळे लोहागावे मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लोहागावे यांनी सांगितले आहे
तालुक्यातील रुई बु येथे शेतकऱ्याचे मोठया प्रमाणात कडबा जळून गेल्यामुळे त्या शेतकऱ्याच्या बैलाच्या वैरणासाठी जिल्हा परिषद नांदेड यांच्या कडून मदत मिळवून देण्यासाठी असून जिल्हा परिषद सदस्य विद्यमान माणिकराव लोहागावे यांनी असे सांगितले की शेतकऱ्यांनी कसल्याच प्रकारची चिंता करू नये असे सांगत ते म्हणाले की ऐन उन्हाळ्याच्या दिवसात व कामाच्या दिवसात बैलांचे खाण्याचे वैरण जळून खाक झाल्यामुळे सदरच्या शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले असल्याने त्यांना जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्फत मदत मिळवून देण्यासाठी नरसी जिल्हा परिषद गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहागावे यांनी पाठपुरावा करून तात्काळ रुई बुद्रुकच्या तीन शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असल्याचे ही सांगितले आहे
रुई बु येथील तीन शेतकऱ्यांचा कडबा जळाला असल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार करून त्यांना बैलाच्या वैरणासाठी व शेतकऱ्यांचे नुसकान झालेल्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून द्यावेत अशी ही माणिकराव लोहोगाव यांनी सांगितले असून रुई बुद्रुकच्या शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक बाजू अगोदर पासून कामकुवत असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कडबा विकत घेणे होत नाही त्यामुळे नरसी जिल्हा परिषद गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहागावे यांच्या माध्यमातून तीन शेतकऱ्याना जिल्हा परिषद नांदेड यांच्या कडून आर्थिक मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे
