Header Ads Widget

तहसीलदाराच्या आदेशानुसार मंडळधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली तलाठी आर के परडवाड यांनी केला पंचनामा शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या दोन आजी माजी सरपंच प्रतिनिधीची मागणी •


     माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथे दिनांक १० मे २०२२ रोजी दुपारच्या दरम्यान अचानक लागलेल्या अग्नी तांडवात तीन शेतकऱ्यांच्या झोपड्यासह कडब्याच्या गंज्या व झाडे जळून गेल्याची घटना रुई बु येथे घडली होती सदरच्या आगीत शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान ही झाले असल्यामुळे नायगावचे तहसीलदार गजाजन शिंदे यांच्या आदेशानुसार मंडळधिकारी डी डी कळकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी आर के परडवाड यांनी सदरील घटनेचा पंचनामा केला असल्यामुळे सदरील शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या अशी मागणी रुईच्या दोन आजी माजी सरपंच प्रतिनिधीने महसूल प्रशासनाकडे केली आहे
तालुक्यातील रुई बु येथील शेतकरी सीताराम धोंडीवा शिंदे यांच्यासह ग्यानोबा धोंडीबा शिंदे, तुकाराम धोंडिबा शिंदे यांच्या लागलेल्या भीषण आगीत झोपडयासह काडब्याच्या गंज्या, टीना पत्रे जळून खाक झाले असल्यामुळे गावच्या सरपंच सौ प्रिंकाताई निलेश देशमुख यांचे प्रतिनिधी निलेश देशमुख यांच्यासह माजी सरपंच सौ कविताताई गजानन शिंदे यांचे प्रतिनिधी गजानन शिंदे यांनी शासनाने सदरच्या शेतकऱ्यांना मदत मिळवून दयावेत अशी मागणी केली असून रुई बु येथील शेतकऱ्याचे अतोनात  अचानक आग लागून नुकसान झाले असल्यामुळे तीन शेतकरी ऐनवेळी उघडा झाला आहे
रुई बु येथे घटनास्थळी गावातील निलेश भाऊसाहेब देशमुख,पत्रकार माधव पवार, गजानन पाटील शिंदे, हरिदास पांडे, प्रकाश पांडे, सुधाकर पांडे, अमोल पांडे, मारोती तेजेराव शिंदे, दिंगाबर तुकाराम शिंदे, सकाराम धोंडिबा शिंदे, संजू शिंदे,आदी यावेळी उपस्थित होते रुई बु येथील तलाठी आर के परडवाड यांनी पंचनामा करून सदरचा अहवाल शासनाकडे सादर करणार असल्याचे तलाठी यांनी सांगितले असून सदर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे रुई बु येथील आजी माजी सरपंच प्रतिनिधीने नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे