नायगाव शहराची खरी ओळख ही नायगाव मध्ये भरणाऱ्या जनावरांच्या बाजारामुळेच आहे काही दिवसां पूर्वी नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांनी या ठिकाणी भरणाऱ्या जनावरांच्या बाजारास भेट दिली असता कडाक्याच्या प्रचंड उन्हामुळे जनावरांना होणारा त्रास त्यांच्या नजरेस पाहण्यात आला त्या अनुषंगाने मांजरम जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्यां सौ पुनमताई पवार यांनी आमदार राजेश पवार वाढदिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी मोकळ्या जागेत पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे
भरवण्यात येणाऱ्या जनावरांच्या बाजाराच्या ठिकाणी पाचशे लिटर पाण्याच्या बारा टाक्यांची सोय करून दिली आहे नायगाव हे तालुक्याचे मोठे ठिकाण असल्यामुळे जनावराच्या ठिकाणी टँकर द्वारे पाणी सुविधा उपलब्ध करून दिली असून या अनुषंगाने दर गुरुवारी या ठिकाणी जनावरांच्या पाण्याची सोय आमदार राजेश पवार व त्यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषद सदस्यां पुनमताई पवार यांच्या स्वखर्चातून करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात वाढदिवसा निमित्त दिनांक बारा मे २०२२ रोजी पासून करण्यात आली आहे
गंगाधर पाटील कल्याण ,माधव शंकरराव पा.कल्याण*
राजू आप्पा बेळगे,सय्यद एजाज, परमेश्वर पाटील सोमठाणकर व पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी आमदार राजेश पवार यांच्या वाढदिवसा निमित्त नायगाव येथे जनावरांच्या बाजारात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नायगाव येथील बैल बाजारात करण्यात आली आहे
