नायगाव तालुक्यातील मौजे कृष्णूर येथील रहिवासी असलेल्या दोन आजी माजी बरबडा जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांनी जर या विभागाचा विकास केला असता तर या गटाची बे अवस्था झाली नसती असा सवाल या भागातील जनतेनी केला असून सदरच्या गटात नागरिकांना अनेक समस्याना सामोरे जावे लागत असून तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद महिला सदस्या सौ मीनाक्षीताई शिवाजीराव कागडे यांच्या माध्यमातून थोडा फार विकास झाला असला तरी अनेक समस्या त्यावेळी सुद्धा उद्भभवल्या होत्या विकास मात्र वाटेल तेवढा झाला नसल्याचे सदरच्या जनतेतुन बोलल्या जात आहे
तालुक्यातील मौजे कृष्णूर येथील ह्या महिला जिल्हा परिषदच्या बरबडा जिल्हा परिषद गटाच्या विद्यमान सदस्या सौ विजयाश्री पंढरीनाथ कमठेवाड यांच्या माध्यमातून बरबडा सर्कलचा विकास करण्यासाठी पुढाकार घेत नसल्यामुळे अनेक रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे दिसून येत असून या गटातून लगतात दोन आजी माजी महिला जिल्हा परिषद सदस्याना विकास करण्यासाठी मतदारानी मोठी निवडून देऊन संधी दिली परंतु या विभागाचा विकास करणे फार अवघड नाही आणि सोपे नाही पण विकास करणे तर अत्यांत गरजेचे असताना सुद्धा सदरच्या महिला जिल्हा परिषद सदस्यां यांनी करण्या विना लांबच राहत असल्याचा सवाल ही जनतेनी केला आहे
कृष्णूर गावासाठी एक भाग्याची बाब असून या गावातून दोन महिला जिल्हा परिषद सदस्य बरबडा जिल्हा परिषद गटातून निवडून जाऊन सदरच्या गटाचा विकास करण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार तथा नांदेड जिल्ह्या मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या बरबडा जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्यां सौ विजयाश्री कमठेवाड तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या पक्षाच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद सदस्या सौ मीनाक्षीताई कागडे यांना विकास करण्यासाठी मतदारानी फार मोठी संधी दिली होती परंतु विकासाची दिशाच वेगळी बनली आहे
