Header Ads Widget

राज्य परिवहन मंडळ अधिकाऱ्याच्या गलथान कारभारमुळे गेल्या तीस ते पस्तीस वर्षा पासून घुंगराळा ते रुई बळेगाव मार्गांवर होतोय ••

लाल परी विना प्रवाशाची गैरसोय -

बस चालू करा जनतेची मागणी --

   

   

     माधव पवार 

नायगाव तालुक्यातील घुंगराळा ते रुई बळेगाव रस्ता तीन तालुक्याशी निघडीत असताना सुद्धा या मार्गांवर राज्य परिवहन मंडळ आधिकाऱ्याच्या गलथान कारभारामुळे गेल्या तीस ते पस्तीस वर्षा पासून मोठया प्रमाणात लालपरी विना प्रवाशाची गैरसोय होताना दिसून येत असून याच मार्गांवर बडापाड ते भोकर ही बस सेवा तत्कालीन अधिकाऱ्यानी सुरळीत चालू केली होती त्या वेळेस राज्य परिवहन मंडळाला मोठा नफा ही झाला असल्यामुळे
 सदरची बस चालू अधिकाऱ्यानी सकाळी व संध्याकाळी
ठेवली होती त्यावेळेस नफाच नफा झाला होता 
बळेगाव ते रुई बु, घुंगराळा याच मार्गांवर भोकर ते औराद ही बस चालू करण्यात आली होती परंतु काही कारणास्तव म्हणजे वंजरवाडी फाट्यावर एका बेवड्या तळीरामाने वहाकास मारहान केल्यामुळे औराद भोकर बस बंद करण्यात आली होती परंतु घुंगराळा येथील रहिवासी असललेले तत्कालीन बस चालक संभाजी तुरटवाड यांनी या मार्गावर बस चालू राहावी म्हणून नरसी ते उमरी बस चालू ठेवली होती प्रवास करणारे प्रवाशी ही बसची मोठया प्रमाणात वाट पाहत होती आणि लाल परीने प्रवास करीत होते हे वास्तव चित्र आहे 
--------------------------------------------------------------------
राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्याना विनंती करून बस सुरळीत या मार्गांवर ठेवून प्रवाशाची गैरसोय थांबविली होती आणि नांदेड ते धर्माबाद बस सेवा चालू करण्यासाठी अधिकाऱ्यानी मान्यता दिली होती आणि बस चालक व्यंकटराव पाटील सुगावे यांचे जनतेतून अभिनंदन ही करण्यात आले होते
-------------------------------------------------------------------
तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु हा मार्ग पाच तालुक्याला जोडला असून यात धर्माबाद, उमरी भोकर, मुदखेड, नायगाव अशा तालुक्याशी निघाडीत असताना सुद्धा राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यानी या मार्गांवर लालपरी चालू करण्यास चाल ढकल करीत असल्यामुळे प्रवाशातुन संताप व्यक्त केला जातं असून या मार्गावर बस सुरळीत ठेवण्यासाठी घुंगराळा येथील रहिवासी असलेले तत्कालीन राज्य परिवहन मांडळाचे कर्तव्यदक्ष चालक व्यंकटराव पाटील सुगावे यांनी बळेगाव व रुई घुंगराळा या मार्गांवर बस चालू ठेवली होती आणि आता बस सुरळीत चालू करावी जनतेची मागणी जोर धरित आहे