Header Ads Widget

नायागांव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्त अभिवादन !!!

नायगाव फास्ट न्यूज / माधव पवार :-


नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष  सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या शुभ  हस्ते स्वातंत्रवीर  सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सदरची जयंती ठाण्याच्या वतीने साजरी करण्यात आली असून यावेळी सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्यासह फौजदार  दिनेश यवले, फौजदार संजय अटकोरे,पोलीस जिप चालक सदाशिव पाटील ,पोलीस नाईक भार्गव सुवर्णकार,पो कॉ.अशोक घुमे,पांचाळ ,शिंदे ,गोपनीय शाखेचे अभिजित पाटील,राहेर बिटचे निकम यांच्यासह आदी पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते 
क्रांतीकारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर दिनांक २४ डिसेंबर १९१० या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती जून मध्ये सावरकरांची रवानगी अंदमानला झाली जिथे त्यांना पन्नास वर्षं काढायची होती अंदमानच्या तुरुंगा बद्दल अनेक गोष्टी त्यांनी ऐकल्या होत्या पण ज्यावेळी सावरकर तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी अंदमानवर काही ओळी सुचल्या होत्या त्या अशा स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कुंटूर ठाण्याच्या वतीने अभिवादन करण्यात आले आहे 
----------------------------------------------------------------------
       " " मुहिब्बाने वतन होंगे हजारो बेवतन पहिले " "
      " " फलेगा हिंद पीछे और भरेंगा अंदमन पहिले " "
-----------------------------------------------------------------------
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात स्वातंत्र्यवीर
सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी त्यांच्या जीवन पटावर सपोनि महादेव पुरी यांच्यासह अन्य कर्मचारी व पत्रकारानी मनोगत व्यक्त केले यावेळी पत्रकार माधव धडेकर दिगंबर,मुदखेडे,आदींची उपस्थिती होती स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा दिनांक २८ मे १८८३ रोजी नाशिकच्या भगूर येथे जन्म झाला सावरकर हे भारतातील महान क्रांतीकांरा पैकी एक होते  ब्रिटिशां विरोधातील कारवायांमुळे त्यांना दोन वेळा जन्म ठेप सुनावण्यात आली होती तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांना सामाजिक रुढी परंपरां विरोधात मोठे काम केले असून त्यांच्या जयंती निमित्त कुंटूर पोलीस ठाण्यात सपोनि महादेव पुरी यांच्या पोलीस टीमच्या अभिवादन करण्यात आले आहे