नायगाव येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवृती विठ्ठलराव हानमंते यांचे अल्पशा आजाराने निधन :-
नायगाव फास्ट न्यूज : -
नायगावच्या महात्मा फुले कॉलनी येथील रहिवासी असलेले दैनिक दलित कैवारीचे संपादक तथा नायगांव तालुका मराठी पञकार संघाचे कार्याध्यक्ष प्रकाशभाऊ हानमंते यांचे वडील निवृती विठ्ठलराव हानमंते यांचे अल्पशा आजाराने दिनांक २४ मे २०२२ रोजी दुपारी पाच वाजता निधन झाले ते मृत्यू समयी ७० वर्षाचे होते
नायगाव येथे त्यांच्या पार्थिवावर दिनांक २५ मे २०२२ रोजी सकाळी ठीक आकारा वाजण्याच्या दरम्यान नायागांव येथील कुशीनारा बौद्ध स्मशानभूमी येथे निवृती विठ्ठलराव हानमंते यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चत पत्नी आई दोन मुले एक मुलगी दोन भाऊ सुना नातु पंतु असा परिवार असून त्यांना नायगाव फास्ट न्यूज परिवाराच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे
