नायगाव फास्ट न्यूज / रामराव ढगे :-
नायागांव तालुक्यासह ग्रामीण भागातील खेड्यापाखेड्यात ग्रामीण पाणी पुरवड्याचा नुसता देखावा झाला असल्यामुळे नागरिकांना कसल्याचे प्रकारचे पाणी सदर योजनेच्या माध्यमातून मिळत नसल्यामुळे अनेक नागरिकांना विकत पाणी घेऊन घ्यावे लागत असल्याचे वास्तव चित्र ग्रामीण भागात पाहवयास मिळत असल्यामुळे ग्रामीण पाणी पूरवठाउपविभाग नायागांव येथील अधिकारी कागद काळे करून मोकळे झाल्याचे सदरील जनतेतून बोलल्या जात असून अनेक गावांला पाणी पुरवठा करण्यासाठी विहीरीचे खोदकाम करण्यात आले असले तरी अर्धवट अवस्थेत आहे
तालुक्यातील असलेल्या खेड्यापाड्यात गेल्या अनेक वर्षाखाली पाणी पुरवठा विभागाच्या मार्फत वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून निधी बजेट मंजूर करण्यात आले परंतु कोणत्याच योजनेच्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी नागरिकाला मिळत नाही तरी ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग नायागांव यांच्या आशिर्वादामुळे पाणी पुरवठा योजनेच्या योजना खोळबंल्या असल्याचे सदरच्या नागरिकांतुन बोलल्या जात असून सदरचे अधिकारी गुत्तेदारा मार्फत केले परंतु कोणत्याच गुत्तेदाराने काम पूर्ण केले नसल्याचे वास्तव चित्र ग्रामीण भागात दिसून येत सदरच्या योजनेचे पाणी नागरिकांना मिळत नसल्यामुळे सदरची योजना बारगळली आहे
नायगाव येथील ग्रामीण पाणी पुरवठ्याचे उपअभियंता जिल्ह्याच्या ठिकाणी राहून बिलोली व नायगावचा कारभार पाहत असल्यामुळे ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात पाण्याची भीषण टंचाई जाणवत असताना सुद्धा उपअभियंता व कनिष्ठ अभियंता कागदी घोडे नाचविण्यातच मग्न असल्यामुळे शासनाचा कोठ्यावधी रुपयांचा निधी गेला कुठे असा प्रश्न जनतेला पडला असून सदरच्या योजना का ? अर्धवट अवस्थेत आहेत असा सवाल सुद्धा नागरिक करीत नायागांव पंचायत समिती अंतर्गत पाणी पुरवठा विभाग सुद्धा अध्याप पाणी टंचाई संदर्भात अधिग्रहण केले किंवा नाही यांचा अंदाज लागत नाही अथवा माहिती देण्यासाठी कोणी ही धजावत नसल्याचे दिसून येत आहे
