हिमायतनगर : - नागोराव शिंदे :--
हिमायतनगर तालुक्यातील वनपरीक्षेत्र अधिकाऱ्याच्या व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात आलेल्या एका हरणाचा
कारला शिवारातील एका विहीरीवर पाणी पिण्यासाठी आलेल्या हरणाने बकेट मधील पाणी पिण्याच्या नादात गळ्यात बकेट अडकल्यामुळे हरणाचा गुदमरून मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली असून ही सदरची घटना दिनांक २२ मे २०२२ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली असून सध्याच्या परिस्थितीत उन्हाची तिव्रता वाढली असल्यानेजंगली प्राणी पाण्याच्या शोधात आहेत
तालुक्यातील हिमायतनगर पासून पाच किलो मीटर अंतरावर असलेल्या कारला व परिसरात पाण्याच्या शोधात हरीण, निळ,वानर,रोही यासारखे वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी रानोमाळ भटकं असताना सुद्धा वन विभागाच्या अधिकाऱ्यानी या विभागात प्राण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली नसल्यामुळे अशा प्राण्याला जीव मुकावा लागत असून कारला शिवारात रविवारी शेतकरी काशिनाथ सोनबा रासमवाड यांच्या शेतात पाणी भरून असलेल्या बकेट मधील पाणी पित असतांना हरणाच्या गळ्यात बकेट अडकली त्यातच त्यांचा मृत्यू झाला या घटनेत गुदमरून हरणाचा जाग्यावर मृत्यू झाला आहे
कारला शिवारात घडलेल्या घटनेची माहिती सदरच्या शेतकऱ्यानी वनरक्षक अमोल कदम यांना दिली असता त्यांनी वाशी भागाचे वनरक्षक नारायण गिते यांना कळविताच पशुवैद्यकीय अधिकारी सोनटक्के,वनमजुर अहेमद ,प्रकाश पवार, प्रकाश मेंडके यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला शेवविच्छेदन केले असले तरी सध्या वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गाव वस्तीकडे धाव घेत आहेत वन्य प्राण्यांच्या जिवीतास धोका निर्माण होत असल्यामुळे वन विभागाने वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाणवठे तयार करून सोय करावी अशी मागणी वन्य प्रेमी नागरिकांतून केली जात असले तरी एका हरणाचा गळ्यात पाण्याचे बकीट अडकून मृत्यू झाला आहे
