नायगाव फास्ट न्यूज / माधव पवार
नांदेड येथे दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान टीव्हीएस शोरूम रोड नांदेड या ठिकाणी प्रेमाचंद भगवानराव जोंधळे वय ४२ वर्षे राहणार भारतनगर सोमेश कॉलनी नांदेड यांच्यावर शिक्षण हत्याराने आरोपीने करून हल्ला करण्यात आल्यामुळे नांदेड शहरात एकच खळबळ उडाली होती सदरच्या घटनेची माहिती वजीराबाद पोलिसांना प्राप्त झाल्याने सदर गुन्ह्यातील जखमी झालेले प्रेमानंद जोंधळे गंभीररित्या जखमी झाले होते उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला सदरचे चाकू हल्ला करणारे पिता पुत्र घटने पासून फरार झाल्यामुळे मयताच्या वडिलानी वजीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिल्या वरून सदरच्या आरोपीच्या विरोधात ३०२ दाखल करून वजीरबाद पोलीस आरोपीच्या शोधात होते परंतु पोलिसांना घटना घडल्याच्या पासून ४८तासात आरोपी जेरबंद करण्याची यशस्वी कार्यवाही पूर्ण झाली आहे
वजिराबाद पोलिसानी सदरच्या गुन्ह्यांतील आरोपी रमेश हातागळे व त्यांचा अल्पवयीन मुलगा त्यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर १४१/ २०२२ कलम ३०२,३४ भारतीय दंड विधानसह कलम ४ / २५ भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्यासाठी सपोनि जमदाडे यांच्याकडे देण्यात आला आला असून नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांचे आदेश नुसार अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे उपविभागीय पोलिस अधिकारी भोकर चंद्रसेन देशमुख उपविभाग नांदेड शेअर यांनी सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या सदरील सूचनेचे पालन करून पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबाद पोलिस ठाण्यात दमदार कामगिरी बजावत असलेले सपोनि संजय.डी निलपत्रेवार यांनी दमदार कामागिरी वाजवून आरोपीला अटक केली आहे
नांदेड येथील वजीरबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चाकू हल्ला प्रकारणातील आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना वरिष्ठानी दिल्या होत्या सदरचे पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्रभर व दिवसभर सदरच्या प्रकरणातील आरोपीचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नव्हता मौजे तळणी या गावी आरोपी असल्याची गोपीनाथ माहिती मिळाल्याने सदर वजीरबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवाड यांच्या सुचनेनुसार ठाण्याचे --
सपोनि संजय डी निलपत्रेवार यांच्यासह विजयकुमार नंदे,मनोज परदेशी, शरद चंद्र चावरे, शेख इब्राम व्यंकट गंगुलवार,संतोष बेलूरोड, बालाजी कदम, आदी पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा मारला असता गुन्ह्यातील मारेकरी रमेश रूक्माजी हातागळे व त्यांचा अल्पवयीन मुलगा सदर ठिकाणी मिळून आला असल्याने सदर आरोपीला रंगेहात खाकी दाखविण्यात वजीराबाद पोलिसांना यश मिळाले आहे
वजीराबाद पोलिसांनी नांदेड येथील चाकू हल्ला प्रकरणातील आरोपी रमेश रुक्माजी हातागळे यांच्यासह त्यांच्या अल्पवयीन मुलास केले अटक करून परत एकदा चौफेरी कामगिरी केली आहे

