Header Ads Widget

नायगाव तालुक्यातील माळइकळी येथे राजेश कुंटूरकर यांच्या सीसी रोडचे उदघाटन - भूगर्भातील जशा जल वाहिन्या असतात त्याच पद्धतीने गावातील रस्ते दिशा दाखवतात शंकर गिरी यांचे मत ••


नायगाव फास्ट न्यूज / बाळु इबितवार 
नायगाव तालुक्यातील इकळीमाळ येथे विकास कामाला गती मिळत असल्यामुळे कुंटूर जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ मधुमतीताई राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या निधीतून सी सी रोडचे उद्घाटन राजेश गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या हस्ते करण्यात आले असून गाव हे विकासाच्या दिशेने जातं असल्यामुळे गावचा विकास आता हळू हळू होताना दिसून येत असून सदरच्या सी सी रोडच्या उदघाटन प्रसंगी गावच्या महिला सरपंच  प्रतिनिधी कैलास सूर्यवंशी व गावचे पोलीस पाटील नारायण पाटील जाधव ग्रामपंचायत सदस्य गंगाधर सूर्यवंशी, माधव शिळे, गणेश जाधव,उपसरपंच प्रतिनिधी शंकर गिरी यांच्या उपस्थित करण्यात आले यावेळी उपसरपंच प्रतिनिधी शंकर गिरी म्हणाले की भुगर्भातील जशा जल वाहिन्या असतात त्याच पद्धतीने गावातील रस्ते ही गावाला दिशा दाखवीत असतात असे यावेळी मत व्यक्त केले आहे 
तालुक्यातील माळइकळी येथे गावच्या विकास कामासाठी कुंटूर जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्यां सौ मधुमती कुंटूरकर यांच्या निधीतुन निधी देण्यात आला असल्यामुळे गावच्या विकासाला चालना मिळत असल्याचे दिसून येत असून कोणत्याही गावा  अंतर्गत रस्ते हेच त्या गावच्या दिशा दाखविनाऱ्या दिशा असतात गावा अंतर्गत रस्ते सुंदर व स्वच्छ ठेवले तरच गावातील नागरिकांचे आरोग्य टवटवीत राहण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय माळईकळी प्रयत्न करीत असल्याचे महिला उपसरपंच याचे प्रतिनिधी शंकर गिरी यांनी सदरच्या उदघाटन प्रसंगी मत व्यक्त करीत पुढे म्हणाले की गावचा विकास ग्रामपंचायत प्रयत्नसिल असल्याचे गिरी म्हणाले गावच्या विकास झकास करण्यासाठी धडपड सरपंच व उपसरपंच आणि ग्रामसेवक प्रयत्न करीत असून इकळीमाळ येथे सी सी रस्ते होत आहेत 
माळइकळी गावचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतला गावकऱ्यांनी सहकार्याची भावना ठेवून विकास कामाला उत्तेजन दिले पाहिजे असे म्हणत पुढे म्हणाले यावेळी 
सरपंच प्रतिनिधी कैलास सूर्यवंशी म्हणाले गावच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असून रस्ते, स्वच्छ पाणी, शिक्षण आरोग्य यासाठी आपल्या सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहील व परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. यावेळी चेअरमन गोविंदराव पा.सोनटक्के,हणमंत पा. पुयड, गोविंदराव पा. पुयड, बालाजी पा. पुयड, दयाळगिर अण्णा, सुभाष पा. पुयड, बळीराम पा. जाधव, बाबाराव पा. पुयड, नारायण पा. जाधव, परमेश्वर पुयड, अजिम शेख, नारायण जोगदंड, तानाजी सुर्यवंशी, गजानन पुयड, व गावातील सर्व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.