नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात महाराष्ट्र दिना बरोबर कामगार दिन ही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आला असेल विविध ठिकाणी सदर ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आली नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजपा रिपाईचे आमदार राजेश पवार यांच्या हस्ते नायगाव तहसील कार्यालयाचे ध्वजा रोहन करण्यात आले नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागातील गावागावात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला यावेळी सुद्धा सर्व शाळेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजा रोहण करण्यात आले तर ग्रामपंचायतीचा ध्वजा रोहन गावचे सरपंच व उपसरपंच आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या शुभ हस्ते करण्यात आले असल्याचे दिसून आले आहे
नायगाव तहसील चा ध्वजारोहण नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहणाच्या प्रसंगी प्रथम महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सदरच्या ध्वजारोहण प्रसंगी बरबडा जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार यांच्यासह मांजरम जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सौ पुनम ताई राजेश पवार, नायगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार गजानन शिंदे, दैनिक लोकमतचे नायगाव तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार वाहबोदीन शेख, गजानन पाटील चव्हाण,देवीदास बोमंनाळे,व्यंकटराव चव्हाण हरिश्चंद्र पाटील चव्हाण, माधव कल्याण,शंकर कल्याण,कोंडीबा पाटील,पत्रकार पंडित वाघमारे शिंदे,संजय मोरे,रामकिशन मोरे आदीसह मान्यवर यावेळी उपस्थित होते
दिनांक १ मे हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने अतिशय महत्वाचा असल्यामुळे आपल्या सगळ्यांनाच माहिती असल्याने याच दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली आणि दुसऱ्या बाजूने म्हणजे या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि मे दिन म्हणून जगभर मान्यता मिळाली असल्यामुळे प्रत्येक देशानुसार कामगार दिन हा वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो परंतु भारतात कामगार दिन भारतातल्या ‘लेबर किसान पार्टी’ने १ मे १९२३ रोजी पहिल्यांदा कामगार दिन साजरा केला असल्यामुळे याच दिवशी भारतात प्रथम लाल झेंडा कामगार दिनाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरण्यात आल्यामुळे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एक मे रोजी सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असल्यामुळे विविध ठिकाणी महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला आहे
