नायगाव तालुक्यासहा ग्रामीण भागासह खेड्यापाड्यात जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग नांदेडच्या अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकाला मोठ्या प्रमाणात पाणी मिळावे म्हणून प्रशासन प्रयत्न करीत असले तरी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग नायगाव यांच्या बेजबाबदार पणामुळे गावा गावात पाणी पुरवठा करणाऱ्या टॉक्या बांधकामासाठी लाखो रुपये शासना कडून मंजूर करण्यात आले परंतु पाणी पुरवठा अधिकाऱ्यासह सरपंच व उपसरपंच आणि ग्राम शेवक यांच्या ढिसाळ नियोजनामुळे अध्याप टॉक्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे अनेक गावातील नागरिकांना पाण्यासाठी उन्हात रानोमाळ भटकावे लागत असून सदरचे बांधकाम करण्यासाठी व चौकशी करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग नायगावच्या अधिकाऱ्यांना वेळ मिळत नसल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे
तालुक्यातील अनेक गावात पाण्याच्या टॉक्याचे काम विहिरीचे नावालाच झाले असून या बाबीकडे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग नायगाव यांच्या बेजबाबदार पणामुळे आणि गावागावातील पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टॉक्या अर्धवट अवस्थेत बांधले असल्यामुळे सदरच्या टॉक्या शोभेच्या वस्तू बनल्या असल्याचे दिसून येत असून सदरच्या पाणी पुरवठा करणाऱ्या टॉक्याचे काम अर्धवट अवस्थेत असताना सुद्धा पाणी पुरवठा अधिकाऱ्यासह सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्यामुळे सदरच्या पाणी पुरवठ्याची योजना चांगलीच ग्रामीण भागात बारगळली असल्याचे वास्तव चित्र दिसून येत असून शासन एका बाजूने लोकांना मुबलक पाणी मिळावे म्हणून प्रयत्न करीतअसते आणि दुसऱ्या बाजूने शासनाचेच दुर्लक्ष होताना दिसून येत आहे
जिल्हा परिषद पाणी पुरवठा नांदेड यांच्या अंतर्गत गावा गावाला मिळणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या योजना नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात सदरील योजनेचा चांगलाच खेळखंडोबा झाल्याचे दिसून येत असून जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग नायगाव यांच्या ढिसाळ नियोजना मुळे खेड्यापाड्यातील बांधण्यात आलेल्या पाणी पुरवठ्याच्या टॉक्या नुसत्या रिकाम्या असल्याचे वास्तव चित्र दिसून येत असून सदरच्या टॉक्या बांधकामासाठी शासनाकडून तुफानी पैसा येत असताना सुद्धा ह्या टॉक्याचे बांधकाम अर्धवट अवस्थेत का ? असा प्रश्न निर्माण झाला असल्यामुळे सरपंच व उपसरपंच आणि ग्रामसेवक टॉकीच्या बांधकामाकडे कमालीचे दुर्लक्ष केल्यामुळे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग नायगावच्या अधिकाऱ्यानी स्वतःलक्ष देऊन पाणीपुरवठा करणाऱ्या अर्धवट टॉक्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी जोर धरीत आहे
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात जिल्हाहा परिषद
ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग नायगावच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी खेड्यापाड्यात आपल्या विभागाच्या मार्फत पाणीपुरवठ्याच्या टाक्याचे बांधकाम करण्यात आले त्या त्या ठिकाणी गावातील नागरिकांना या योजनेच्या मार्फत पाणी मिळत आहे का ? शेजारी शोध मोहीम चालू केली तरी कोणत्याही गावात नागरिकांना सदरच्या योजनेचा माध्यमातून पाणी मिळते का हाजरी सर्व्हे केला तरी कोणत्याच गावात सदरची योजना सुरळीत नाही कारण पाणीपुरवठा योजनेच्याया टाक्या अर्धवट अवस्थेत असल्यामुळे नागरिकाला पाणी मिळणेेे शक्य नसल्याचे दिसूून येत आहे
