नांदेड शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारीला मोडून काढण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्राचे निसार तांबोळी यांच्यासह पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे भोकरचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांनी नांदेड शहर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या वरून सदरील सूचनेचे पालन करीत वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या आदेशानुसार ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार यांनी वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी गुन्हेगारांना चेक करून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्या करिता सूचना दिल्या होत्या वजिराबाद पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष साहाय्यक पोलीस निरीक्षक निलपत्रेवार यांच्या पथकातील पोलिस कर्मचारी करडी नजर ठेवली असल्यामुळे दोन अल्पवयीन मुलासह आठ आरोपीला रंगेहात पकडण्यात आले आहे
दिनांक २९ एप्रिल २०२२रोजी वजिराबाद पोलिस ठाण्याच्या शोध पथकाचे प्रमुख तथा कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ताराम जाधव, गजानन किडे, विजयकुमार नंदे,मनोज परदेशी, शरद चंद्र चावरे, शेख इब्राम व्यंकट गंगुलवार,संतोष बेलूरोड, बालाजी कदम, यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय माहिती माहिती प्राप्त झाल्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात गुन्हेगारांची टोळी थांबलेली होती त्यांच्यामध्ये चोरीच्या पैशाचे व मोबाईल वाटण्याच्या कारणावरून वाद होत असल्याने त्यानुसार वजिराबाद पोलिस ठाण्याचे सपोनि संजय निलपत्रेवार यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर छापा मारला असता सदरच्या कारवाईत आरोपी अशफाक शेख रज्जाक राहणार नुरी चौक नांदेड, सुरज उर्फ सुन्या शंकर सोनटक्के राहणार कुमार गल्ली चिखलवाडी नांदेड, शेख शोएल शेख सतार राहणार तेहरा नगर कॉलनी नांदेड, शेख शोएल शेख रजाक राहणार देगलूर नाका नांदेड, चंद्रकांत प्रकाश नेरले राहणार कुंभार गल्ली नांदेड, मदन केशव बटेवाड राहणार कोल्हा तालुका मुदखेड यातील दोन अल्पवयीन बालक मिळून आले आहे
वजिराबाद पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन चौकशी सत्र पोलिसांनी चालू केले असता त्यांनी पोलिसाला उडवा उडवीचे उत्तर देऊ लागले त्यांना अधिकची माहिती विश्वासात घेऊन विचार पुस करण्यात आले त्यावेळेस त्यांनी मागील एका महिन्यापासून मोबाईल चोराच्या घटना केल्याचे सांगितले त्यासाठी भाग्यनगर हद्दीतून स्प्लेंडर मोटरसायकली,अर्धापूर हद्दीतून एफ झेड मोटर सायकल, मुदखेड हद्दीतून पलसर मोटर सायकल,अशा चोर्या केल्याचे सांगितले असून सदरच्या अल्पवयीन बालकाकडे चोरीचे एकूण १७ मोबाईल एक चांदीची चैन, एक लाख रुपयाच्या मोटरसायकली चोरी एक मोटर सायकल असा एकूण दोन लाख सहा हजार तीनशे रुपयांचा ऐवज मिळून आला तर मुदखेड येथील गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर एक लाख रुपयाच्या मोटर सायकली आणल्या असल्याचे सदरच्या आरोपीने सांगितले असून असे एकूण तीन लाख सहा हाजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

