औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेले मयत मनोज शेषराव आव्हाड, शहा-बाजार चंपा चौक, म्हाडा कॉलनी औरंगाबाद येथे विकृत मानसिकतेतून आठ जणांनी पूर्वनियोजित कट करून मनोज शेषराव आव्हाड यांची हत्या करण्यात आली हत्या प्रकरणातील आरोपीला फाशी देण्यात यावी म्हणून नायागांवच्या तहसीलदाराला कार्यकर्त्यानी निवेदन दिले असून यांच्या हाथाला समतेच प्रतीक असणारे निळा रंगाचा स्कार्फ व पंचशील रंगाचा स्कार्फ याने मनोजचे हाथ बांधून त्याचे हालहाल करून लोखंडी रॉडने त्याच्या पाठीवर, मानेवर, मनक्यावर, पायावर, डोक्यात वार करत बेदम मारहान करून हत्या करण्यात सदरील प्रकरणा व्हिडीओ करून वायरल करणाऱ्या लोकांनी ही अटक करून फाशी देण्यात यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
औरंगाबाद येथे घडलेल्या घटनेत मनोज आव्हाड यांची सदरील प्रकरणात आठ जणांच्या विरोधात औरंगाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून FIR क्रमांक ०१९५ असून ही घटना अतिशय मनाला चीड निर्माण करणारी असल्यामुळे अश्या विकृत प्रवृत्तीच्या लोकांना समाजात जगण्याचा अधिकार नसल्याचे निवेदन कर्त्यांचे म्हणे असून सदर हत्या प्रकरणतील आरोपींना फाशीची
शिक्षा देण्यात यावी,हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा,मनोजच्या घरची परिस्थिती अतिशय नाजूकीची असल्यामुळे शासनाने सहानुभूती पुर्वक विचार करून विशेष बाब म्हणजे पीडित परीवाराला आर्थिक मदत म्हणून पंचवीस लक्ष रुपये देण्यात यावे या मागणीसाठी नायगावच्या तहसीलदाराना निवेदन देण्यात आले आहे
पीडित परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरीत समाविष्ट करण्यात यावे.अश्या मागण्यांचे निवेदन मा. तहसीलदार गजानन शिंदे साहेब यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री, मा. गृहमंत्री, मा. सामाजिक न्यायमंत्री यांना देण्यात आले. त्या निवेदनावर फकिरा ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण भालेराव, सामाजिक कार्यकर्ते कैलास भालेराव, हाणमंत आईलवार, कैलास वाघमारे, परमेश्वर गारोळे, धम्मदीप, चंद्रकांत सुर्यकार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्या प्रसंगी तलाठी संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील जाधव उपस्थित होते.मयत मनोज आव्हाडच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कैलास भालेराव आणि प्रवीण भालेराव यांनी दिला आहे
हात जोडून दया मागत होता राक्षसी अवताराचे
हैवान जिथे लागेल तिथे दंडुक्याने मारत होते जबर मारहाण करीत असताना याच प्रकरणातील राक्षसी प्रवृत्तीचे काही हैवान व्हिडिओ तयार करत होते सदरची घटना ही मानवतेला काळीमा फासणारी असल्यामुळे औरंगाबाद हत्या प्रकरणातील घटनेचा ग्रामीण भागात निषेध करण्यात येत आहे
