Header Ads Widget


राज्यातल्या राजकीय भोंग्याचे राजकारण राज्यकर्त्यांनी तात्काळ थांबवून राज्याच्या हितासाठी जास्तीचे प्रधान्य द्यावे  नुसत्या भोंग्या वरून राजकारण नको --

राज्यात विकासाचे राजकारण असले पाहिजे जनतेचा सवाल -

          माधव पवार 
महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात सध्याच्या परिस्थितीत पाहिले तर राज्यात विकासाचे राजकारण राजकीय नेते करण्यापेक्षा एकमेकांना संपवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे राज्यात दिसून येत असून राज्यात परिस्थिती कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षा पासून ढासाळली असताना सुद्धा ते सुधारण्या पेक्षा कोणत्या न कोणत्या कारणामुळे टिकेच्या फायरिंगा एकमेकावर टाकून घेत असल्यामुळे राज्याच्या विकासाकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नसले तरी वायफळ राजकारण करून राज्याची परिस्थिती ढसाळून टाकू नका असा सवाल जनतेने केला असला तरी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला एक अल्टीमेटम दिला असल्यामुळे राजकीय पुढाऱ्यासह ग्रामीण भागात भोंग्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत असल्यामुळे सदरचे राजकारण करण्यापेक्षा विकासाचे राजकारण केल्यास राज्य सुजलाम सुफलाम झाल्या शिवाय राहत नाही असा सवाल जनतेनी केला आहे
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्यातील राज्य कर्ते यांनी राज्याच्या जनतेचा विचार करून हिंदू मुस्लिम शीख इसाई हम सब भाई भाई या विचाराचे राज्य चालावे असे ही जनतेतून बोलल्या जात असून असून देशात लोकशाही असताना सुद्धा हुकूमशाहीचा आवलंब करून राज्यात व ग्रामीण भागात दिवसा ढवळ्या खून दरोडे, चाकू हल्ले होताना दिसून येतात हे मोठया प्रमाणात थांबले तरच राज्य प्रगती शील होईल असे ही जनसामान्य माणसातून बोलल्या जात असले तरी राज्यातले राजकारण विकासावर होण्या ऐवजी सध्याच्या परिस्थितीत भोंग्याचे राजकारण हळू हळू तापत असल्यामुळे कुठे थंड होऊन विकासाच्या दिशेने गेले पाहिजे हा जनतेचा मुळे हेतू असून सध्याच्या परिस्थितीत राज्यात राजकीय वातावण कोणत्या न कोणत्या करणावरून होत आहे
राज्यातील आघाडी सरकार वर केंद्र सरकार आणि राज्यातील विरोधी पक्षाच्या नेते मंडळीने निशाणा साधत असला तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार वर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी टिकेचा बडीमार चालू ठेवल्यामुळे राज्यातले राजकीय नेते मंडळी घायाळ होत नाहीत फक्त या महाराष्ट्र राज्यातील जनता मायबाप घायाळ होताना दिसून येत असून जनतेला अनेक संकटाचा सामना करावा लागत असल्यामुळे राज्यातल्या राज्य कर्त्यांनी पेट्रोल डिझेल, गोडेतेल, गजाळी सिमेंट, गॅस अन्य वस्तूचे कडाडलेले दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावे असे ही जनतेतुन बोलल्या जात असून देशाच्या प्रगतीत विरोधक आणि सत्तेतील सगळ्यांचा हातभार लागला पाहिजे असा सवाल जनतेनी केला असून इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रातच राजकारणाला उत्त असल्याचे सुद्धा जनतेतून बोलल्या जात असून राज्य विकासाच्या दिशेने सर्व राजकीय नेते मंडळी नेले तरच राज्याची चांगली उन्नती होईल परंतु तसे सध्याचे राजकारण होताना दिसत नाही केवळ याला संपवा त्याला संपवा असेच वातावरण सध्या राज्यातील जनतेला ऐकावयास पाहण्यासाठी मिळत आहे
राज्यातल्या राजकीय भोंग्याचे राजकारण राज्यकर्त्यांनी तात्काळ थांबवून राज्याच्या हितासाठी जास्तीचे प्रधान्य द्यावे  नुसत्या भोंग्या वरून राजकारण नको -- राज्यात विकासाचे राजकारण असले पाहिजे राज्यातल्या जनतेचा नेत्याला सवाल ---