Header Ads Widget

ग्रामीण भागातील सार्वजनिक समशान भूमीचे शेड अर्धवट अवस्थेत असल्यामुळे गावकऱ्यांना करावी लागते पुरातन काळातील समशान भूमीतच अंत्यसंस्कारतालुक्यात अनेक गावाच्या नागरिकांना समस्‍या

            माधव पवार
शासनाने नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात सार्वजनिक समशान भूमीच्या शेडसाठी निधी मंजूर करून दिला असला तरी सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे समशान भूमित बांधण्यात आलेले समशान शेड हे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे अनेक गावकऱ्यांना नागरिकांना पुरातन काळातील स्मशान भूमीतच अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत असून शासनाने सदरच्या समशानभूमीसाठी लाखो रुपयाचा निधी मंजूर केलेला निधी कुठे गेला ? असा प्रश्न गावकऱ्यासह जनतेला पडला असून समशान भूमीच्या शेडमध्ये प्रेताला वर ठेवून अग्नी देण्यासाठी लोखंडी पाळण्या प्रमाणे करण्यात आले नसल्यामुळे अनेक गावात शेडमध्ये दगड बाजूला लावून अंत्यविधी करण्यात येत असल्याचे वास्तव चित्र पाहावयास मिळत आहे

ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात पुरातन काळातील समशानभूमीच नाही तर काही गावात एखादया वेळेस जर वाद-विवाद झाल्यास अंत्यविधी करण्यासाठी मोठे प्रॉब्लेम येत असल्याचे अनेक वेळा ऐकावयांस व पाहण्यास मिळालेअसले तरी शासनाने सार्वजनिक समशान भूमीची निर्मिती करून शेड बांधण्यासाठी निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिला असताना सुद्धा सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगनमताने सदरच्या समशानभूमीच्या शेडचे काम अर्धवट राहिले असल्यामुळे गावातील नागरिकांना ऐन वेळी अंत्यविधीचा मोठा प्रश्न पडत असून गावकऱ्याना संकटाचा सामना करावा लागते  कारण समशान भूमित शेड बांधले खरे परंतु त्या ठिकाणचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे गावातील पुरातन काळातीलच समशान भूमीतच अंत्यविधी करावी लागत असल्याचे दृश्य पाहाण्यासाठी तालुक्यातील खेड्यापाड्यात चित्र मिळत आहे
नायगाव येथील यगाव तालुक्यात काही गावात स्मशान भूमीच नसल्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आणि अंत्यविधी करण्यासाठी कधी शेतकऱ्याकडून अडचण भासते तर कधी अंत्यविधी कुठे करावे असा प्रश्न बऱ्याच पैसे गावात मागील काळात उद्भभले असल्याचे सरळ सरळ दिसून आले असताना सुद्धा शासनाने अनेक गावात स्वतंत्र समशान भूमीची जागा उपलब्ध करून दिली नसल्यामुळे आज ही अनेक गावातील प्रश्न गंभीर असल्याचे बऱ्याच पैकी ठिकाणच्या नागरिकांतून बोलल्या जात असून सदरची बाब लक्षात घेऊन शासनाने सार्वजनिक समशान भूमी बरोबर स्वतंत्र समशान भूमीची निर्मिती करून द्यावेत आणि गावकर्‍यांनी सुद्धा शासनाकडे पाठपुरावा करावेत पाहिजे असे ही सदरील जनतेतून बोलल्या जात आहे