जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका पूजन, प्रवचन व दर्शन सोहळा नायगांव बाजार येथील हनुमान मंदिर मैदानावर संपन्न झाला. या सोहळ्याला नांदेड जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित राहिले होते. भक्तगणांच्या मांदियाळीने नायगांव बाजारपेठेला जणू उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. विषेशष म्हणजे नायगांव नगर पंचायतीच्या वतीने शहरातील मुख्य रस्ते व मंडपाचा परीसर स्वच्छता करून चक्काचेक करण्यात आले होते सोहळ्याची सुरुवात युवा नेते रविंद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ फोङुन नायगांव येथील राजराजेश्वर मंदिरापासून जगद्गुरु श्रींच्या पादुका भजनाच्या सुरात डोईवर कलश घेऊन झेंडे पताका लेझीम पथक व बंजारा नृत्याचे मिरवणुकीचे आकर्षण होते. गण गण गणात बोतेच्या जयघोषात फटाक्यांची आतषबाजी करत पादुकांचे पालखीतून व्यासपीठावर आगमन झाले. सामुदायिक पादुका पूजनाचा मान बळेगावातील भाविकांना मिळाला.पादुकांचे मानकरी उपानगरध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांच्या हस्ते पुजन करण्यात आले आहे
यानंतर सामाजिक उपक्रमाअंतर्गत बारा अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषी विषयक मोटर पंपाचे वाटत माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, श्रावण पाटील भिलवंडे, सौ.प्रतिभाताई प्रतापराव चिखलीकर, बळवंतराव पा.बेटमोगरेकर, माधवराव अप्पा बेळगे, युवा नेते रविंद्र पाटील चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण, सुरेश पा कल्याण, शिवाजी पा.कल्याण, हणमंतराव पाटील चव्हाण, प्रविण पाटील चिखलीकर, सय्यद रहीम, आनंदराव पाटील चव्हाण, सतिश लोकमवार, साईनाथ वट्टमवार, नारायण जाधव, विठ्ठल बेळगे, शंकर कल्याण, माधवराव कंधारे, माणिक चव्हाण साईनाथ चन्नावार. आदींची उपस्थिती होती. त्यानंतर पादुकांची महाआरती झाल्यानंतर ज.न.म. प्रवचनकार मधुराताई पेशवे म्हणाल्या की आपल्या जीवनाचे नाव पहिल्या तीरावर नेण्यासाठी गुरूची साथ अत्यंत महत्वाची आहे. गुरूच्या आशीर्वादाने अशक्य ही शक्य होते. त्यामुळे आपल्याला निर्गुण परमात्म्याची भक्ती करण्यासाठी पादुका प्रवचन दर्शन सोहळा कलियुगात मोठे माध्यम आहे
असे त्यांनी यावेळी आपल्या प्रवचनातून स्पष्ट केले असून ते म्हणाले जगद्गुरू श्रींचे ईश्वर रुपात आल्यावर गुरु दत्तात्रय पासून गुरु परंपरेने सिद्ध शक्ती त्या सिद्ध पादुकांमध्ये असते व जगद्गुरु नरेंद्राचार्याजी महाराज यांच्या संस्थांनाच्या अंतर्गत सत्संगाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीच्या उपक्रमात हजारो नागरिकांचे व्यसनमुक्ती केली आहे व अजुनही उपक्रम प्रभावी पणे राबवली जात आहे. याचं बरोबर रक्तदान शिबिर घेऊन लाखो बाटल्या रक्त शासकीय रुग्णालयात जमा करण्यात आले आहे. देहदान, अवयव दान शिबिरे असे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले असून यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचे प्रवचन ऑन लाईन सादर करण्यात आले. तसेच काही भक्त गणाना साधक दीक्षा देण्यात आली. शेवटी फुले उधळून सांगता झाली.महाप्रसादाचे आयोजन माजी आमदार वसंतराव चव्हाण व परीवाराच्या वतीने करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे
प्रमुख व्यवस्थापक सुमित लंके,पिठ प्रमुख गणेश मोरे, प्रोटोकॉल सचिन तोडकर,अॅडिटर संतोष तायडे, जिल्हा निरिक्षक काकासाहेब वनारसे सह जिल्हा, उत्सव समितीचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष,सतसंग प्रमुख,आरती केंद्र ---
प्रमुख संग्राम सेनिक पदाधिकारी व भक्तगण यांच्या उपस्थितीत सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचलन ज.न.म.प्रवचनकार डॉ दर्शनाताई राठोड यांनी केले.

