नायगाव तालुक्यातील बरबडा ते वजीरगाव पुलाचे काम चालू करण्यात यावे म्हणून अनेक वेळा बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या सदरच्या बातम्याच्या बडीमारा नंतर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यासह गुत्तेदाराला अंदाजे आडीच तीन वर्षा नंतर जाग आली आणि पुलाच्या कामाला विलंब न लावता पुलाच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आल्याचे दिसून येत असून सदरचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगावच्या अधिकाऱ्यासह गुत्तेदाराच्या बेजबाबदार पणामुळे पुलाचे काम रेंगाळले होतेया भागातील जनतेला ३६५ दिवस म्हणजे अंदाजे तीन वर्षाचे १०९५ दिवस या पुलाचा नागरीकाला मोठा त्रास झाला असल्यामुळे सदरच्या जनतेतून संताप व्यक्त करण्यात आला असल्याचे या विभागातील जनतेनी सांगितले असले तरी या विभागातून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधीला विकासाचे काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे
तालुक्यातील बरबडा ते वजीरगाव पुलाचे उदघाटन नायागांव विधानसभा मतदार संघांचे तत्कालीन माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते आणि बरबडा गावाचे तत्कालीन सरपंच बालाजी मदेवाड होते सदरील कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषदेचे विद्यमान माजी अध्यक्ष रावसाहेब पाटील मोरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांच्या बरोबर जिल्हा परिषदच्या सदस्यां ही कार्यक्रमाला उपस्थित होत्या अनेकाचे भाषणे ही झाले होते सदर पूल हा सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यासह गुत्तेदार सायाळकर यांनी जनतेची होत असलेली आडचण लक्षात घेऊन पुलाचे जलत गतीने करण्यात यावे म्हणून भाषणे ठोकले होते परंतु सार्वजनिक बांधकाम उप विभागाच्या अधिकाऱ्यासह गुत्तेदाराच्या बेजबाबदार पणामुळे कोरोना महामारीच्या नावाखाली रेंगाळतले होते परंतु बातम्याच्या बडीमारामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यासह गुत्तेदाराची झोपेतच उडाली आहे
बरबडा ते वजीरगाव रखडलेले चालू करण्यात यावे म्हणून एका नामांकित वर्तमान पत्रातून म्हणजे दैनिक प्रजावाणीतुन अनेक वेळा बातम्या प्रकाशित करण्यात आल्या असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगावच्या अधिकाऱ्यासह गुत्तेदाराची झोप ही उडाली असल्यामुळे गुत्तेदारान पुल बांधकाम करण्यासाठी यंत्रणा चालू केली असून एक ते दीड महिन्यावर पावसाळा ठेपला असला तरी बरबडा ते वजीरगाव पुलाचे काम मोठ्या जोमाने चालू असल्याचे दिसून येत असून बरबडा गावाच्या शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी जीव धोक्यात ठेवून पोटाला पेट्या बांधून घेऊन पोहोत शेतकडेकडे जावे लागत होते सदरचे काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे पाच ते सहा महिने निदान लागू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात असून बळेगाव बंधाऱ्याच्या बॅक वॉटरच्या पाण्यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास दरवर्षी सहन करावा लागत असला तरी सदरच्या पुलाचे काम गुत्तेदाराने चालू केले आहे
