नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथे दिनांक २५ एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी ठीक आठ वाजण्याच्या दरम्यान नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष नागेश पाटील कल्याण यांच्या नेतृत्वाखाली तालुका मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यामुळे बरबडा येथील पत्रकाराच्या वतीने बरबडा बस स्टँडवर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली असून नायगाव पत्रकार संघाला मिळालेला पुरस्कार हा सर्वासाठी सन्मानित करणारा असल्यामुळे सदरच्या पुरस्काराचे नायगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांनी आदराची भावना ठेवून मिळालेल्या पुरस्कारांचा गौरव करावा असे विद्यमान अध्यक्ष नागेश पाटील कल्याण यांनी यावेळी बरबडा ययेथे आवाहन केले आहे
तालुक्यातील मौजे बरबडा येथील सर्व पत्रकार बांधवांनी एकत्रित पणे येऊन नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष नागेश पाटील कल्याण यांच्यासह तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष माधव मामा कोकुर्ले,रामकृष्ण मोरे यांचा यावेळी पत्रकाराच्या वतीने सन्मान करण्यात आला बरबडा पत्रकार संघ सर्कल प्रमुख चंद्रकांत सूर्यतळ,बापूराव बडूरे देविदास जेटेवाड, बालाजी शेवाळे, केरबा रावते, अंकुश कुमार देगावकर, यांनी प्रथम नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या आजी माजी अध्यक्षांचा सन्मान केला त्यानंतर नागेश पाटील कल्याण यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यामुळे बरबडा येथील बस स्टँड वर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली असून यावेळी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
नायगाव तालुक्याच्या मराठी पत्रकार संघात काम करणाऱ्या पत्रकारांची ख्याती आता राज्याच्या वर्तुळात गाजत असल्यामुळे सदरचा पुरस्कार संघ सक्षम ठेवण्यासाठी नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष नागेश पाटील कल्याण नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे विद्यमान जिल्हाउपध्याक्ष बाळासाहेब पांडे,यांनी प्रयत्न करीत असल्यामुळे वरिष्ठ पातळीवर ही तालुका मराठी पत्रकार संघाला मिळालेला बहुमान म्हणजे राज्यस्तरीय पुरस्कार असून सदरचा पुरस्कार मिळण्यासाठी नागेश कल्याण तालुका असल्याचे बरबडा येथील पत्रकारांना सांगितले नायगावला पुरस्कार जाहीर झाला असल्यामुळे सर्वच पत्रकार बांधवांचे योगदान असल्याचे सांगितले सदरच्या पत्रकार संघटनेत काम करणाऱ्या बरबडा येथील पत्रकारांचे विद्यमान अध्यक्ष नागेश पाटील कल्याण व तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष माधवराव मामा कोकुर्ले, रामकृष्ण मोरे यांनी कौतुक केले आहे
