मधुकर जवळे / मारोती कोपलंवार -
जिल्ह्यासह तालुक्यात गेल्या दिनांक २५ जुलैच्या नंतर पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील काही उरलेले सुरलेले पीक वाळून जाण्याच्या मार्गावर असताना दिनांक २९ ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी नायगाव शहरासह परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असला तरी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा भासत असून सध्याच्या परिस्थितीत जमिनीला बेगा पडत असल्यामुळे दमदार पावसाची आवश्यकता जाणवते जर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यास ऊन धरून पिके वाळून जाण्याची भीती परत एकदा शेतकऱ्यात पडली आहे
राज्याच्या राजकारणात राजकीय खेळखंडोबा चालूच असल्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप तरी पिकाची नुकसान भरपाई देण्यात आली नसल्यामुळे शेतकरी गट अडचणीत सापडला असताना सुद्धा शासना कडून कोणतीच मदत शेतकऱ्याना मिळाली नसल्यामुळे शेतकऱ्यांच काय होणार असा प्रश्न शेतकरी गटातून होत आहे
जुलै महिन्याच्या सात तारखे पासून १५ जुलै २०२२ पर्यंत मुसळधार पाऊस पडल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाहून व नष्ट झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू ढळत असताना दिसून आले त्यानंतर २५ जुलै रोजीच्या दरम्यान परत एकदा जिल्ह्यासह तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचा चांगलाच धुरळा वाजला होता तब्बल एका महिन्याच्या नंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे ना जमिनी पूरक पाऊस पडला ना जास्त प्रमाणात पाऊस पडला असल्यामुळे शेतकरी गट परत एकदा चिंताग्रस्त बनला आहे
