माधव पवार
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या काकांडीच्या पुला जवळ लाडका जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला अपघात झाल्याची घटना घडली असल्याचे सांगण्यात येत असले तरी यातील काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे ही सांगण्यात येत असून सदरच्या बस मध्ये किती प्रवासी प्रवास करीत होते यांची अद्याप माहिती मिळू शकली नसल्याचे व्रत प्रकाशित करण्यात येते सदरची घटना ही दिनांक २९ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे सांगण्यात आले
नांदेड ते राज्य महामार्गावर असलेल्या काकांडी पुलाच्या उताराला परिवहन मंडळाची बस नांदेड कडून लाडक्यायाकडे जात होती असे सांगण्यायात येते सदरची बस क्रमांंक एम एच २० बी एल ०६६२ अपघात झाल्यामुळे तरुण वर्ग व्हिडीओ आणि फोटो काढण्यात मग्न असल्याचे दिसून आले राज्य परिवहन मंडळाच्या बसचे चालक ही किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येते सदरच्या बसचा अपघात कशामुळे झाला यांची माहिती मिळू शकली नसले तरी बस मधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे कळते -
काकांडीच्या पुलावर बसला अपघात झाल्यामुळे घटना पाहण्यासाठी तुफानी गर्दी जमली होती आणि बस मध्ये प्रवास करणारे काही वयोवृद्ध मंडळी बस मध्ये असलेले सामान शोधण्यासाठी फिरू लागल्याचे वृत्त असून अपघात घडलेल्या ठिकाणी काही सुज्ञ नागरिकांनी व नवतरुण वर्गाने प्रवाशांना विचारपूस केली केले असता त्यातील काही किरकोळ झाल्याचे सांगण्यात आले तर काहींनी कसल्याच प्रकारचा मार लागला नसल्याचे सांगण्यात आले असले तरी साधारण प्रवासी जखमी झाल्याची माहीती मिळत असले तरी नावे मात्र समजू शकले नाहीत
