नांदेड जिल्हासह ग्रामीण भागात विनाकारण चुकीच्या घटनेची माहिती व व्हिडीओ व्हाट्सअपच्या माध्यमातून वायरल होत असताना पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले असल्यामुळे होत असलेल्या अफवाला ब्रेक लावण्यासाठी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ रोजी सर्व पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याना अफवा करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी आदेश देणार असल्याचे पोलीस अधीक्षक शेवाळे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
सध्याच्या परिस्थितीत गणेशोत्सवाच्या काळात खोट्या अफवा करणाऱ्याची कसल्याच प्रकारची गैय केली जाणार नाही व व्हाट्सअप, फेसबुक अशा शोशीयल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती वायरल केल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यानी कारवाई करावी असे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी सांगितले आहे
जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशानुसार नुसार पोलीस प्रशासन प्रयत्न करीत असून दुसरी कडे थोंताड लोका कडून अफवा केल्या जात आहेत त्या अफवाना आळा बसविण्यासाठी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी जनतेत भीतीचे वातावरण पसरले असल्यामुळे ते दूर करण्यासाठी ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यासाठी सुद्धा संबंधित ठाणे प्रमुखांना सुचना देणार असल्याचे पोलीस अधीक्षककानी सांगितले आहे
