बरबडा प्रतिनिधी : किरण हनमंते
बरबडा :- बरबडा ते वजीरगाव रोडवरील व आंतरगावाजवळील या दोन पुलाची पाहणी मा.बि. के. शेट्टे साहेब अधिक्षक पाटबंधारे मंडळ नांदेड व मा. संजय
चाकुरकर उपविभागीय अभियंता विष्णुपुरी विभाग क्र. २ यांच्याकडून करण्यात आली आहे यावेळी जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे अध्यक्ष तथा प्राचार्य भाजपा चे दिलिपराव धर्माधिकारी, शिवाजीराव धर्माधिकारी, पुलाचे काम करणारे गुत्तेदार अजय सायाळकर, प्रा. सुदर्शन धर्माधिकारी, ग्रामपंचायत चे सदस्य बालाजी घोसलवाड, बाबु बेग, अतुल धर्माधिकारी आणि पत्रकार किरण हनमंते, लायक शेख, आनंदा पोतनवार, सुलतान सय्यद यांची उपस्थिती होती
बरबडा येथील पुलाची पाहणी केल्यानंतर आंतरगाव येथील पुलाची पाहणी केल्याचे सांगण्यात आले.आंतरगाव येथील पुल पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने तिथल्या परिस्थिती चा आढावा घेऊन त्याची पाहणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.
बरबडा येथे नविन पुलाचे बांधकाम अतिशय संत गतीने चालु असल्यामुळे गुत्तेदाराने ज्या वेळेत काम पुर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्या वेळेत पुर्ण केले नाही. यंदाच्या पूरग्रस्त मुळे तो पुल पुर्णपणे पाण्याखाली गेल्याने बरबडा वासियांचा रहदारी चा मार्ग पुर्णपणे बंद झाला होता. बाभळी बंदाऱ्यामुळे त्याचे बॅकवाटर येळी येथील पुला पर्यंत जात असल्याने या बरबडा पुलाजवळ सतत पाणी असल्यामुळे त्याची लांबी व उंची वाढवणे गरजेचे होते पण काम झाल्याने उंची वाढविणे शक्य नाही म्हणुन त्याची लांबी ६० ते ७० मीटर वाढविण्यासाठी चे निवेदन दिलिपराव धर्माधिकारी यांनी अधिक्षक बि. के. शेट्टे यांना दिले आहे. या वेळी वरिल सर्वांची उपस्थिती होती. या निवेदनामध्ये त्या पुलाची लांबी वाढवून देण्यात यावी असे सांगण्यात आले
